महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

४ दिवसांच्या संततधार पावसामुळे भंडाऱ्यात भात लावणीच्या कामाला सुरुवात

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ७२ टक्के पाऊस झाला असून सर्वात जास्त पाऊस पवनी, तुमसर, लाखांदूर, साकोली तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १५ टक्केच भात लावणीचे काम झाले आहे.

भंडाऱ्यात भात लावणीच्या कामाला सुरुवात

By

Published : Aug 1, 2019, 10:30 PM IST

भंडारा -चार दिवस संततधार पाऊस पडत असल्यामुळे शेतकरी सुखावला असून जिल्ह्यात भात लावणीच्या कामाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली असून आतापर्यंत जिल्ह्यात १५ टक्के भात लावणीच्या पूर्ण झाली असून ऑगस्ट महिन्याच्या २० ते २२ तारखेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यातील भात लावणीचे काम पूर्ण होतील असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. काम करताना शेतमजूर थकवा दूर करण्यासाठी लोकगीते गायिली जात आहेत.

भंडाऱ्यात भात लावणीच्या कामाला सुरुवात

जुलै महिन्यात पावसाने दडी मारली होती त्यामुळे पिके करपत चालली होती. मात्र, पाऊस पडला भात लावणीच्या कामाला सुरुवात झाली.
भाताची लावणी करणे शारीरिकदृष्ट्या कठीण काम असल्याने यातून मनोरंजन व्हावे होेणार त्रास कमी व्हावे आणि खेळीमेळीच्या वातावरणात रोवणीचे काम सहज व्हावे याकरीता महिला वेगवेगळे लोकगीते म्हणत असतात.

जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ७२ टक्के पाऊस झाला असून सर्वात जास्त पाऊस पवनी, तुमसर, लाखांदूर, साकोली तालुक्यात झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १५ टक्केच भात लावणीचे काम झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details