महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bhandara Congress Rebellion : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या भंडाऱ्यात काँग्रेसमध्ये बंडखोरी उफाळली, पाच पदाधिकारी सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित - Marathi News Bhandara Elections 2021

काँग्रेस पक्षांतर्गत बंडखोरी काही नवीन नाही. मात्र प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोलेंच्या ( Congress State President Nana Patole ) भंडारा जिल्ह्यातच काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली ( Bhandara Congress Rebellion ) आहे. भाजपच्या आयात उमेदवाराला काँग्रेसची उमेदवारी दिल्याने काँग्रेसमधील जुन्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवाराचा प्रचार केला. त्यामुळे ५ पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले.

नाना पटोले
नाना पटोले

By

Published : Dec 21, 2021, 12:10 PM IST

भंडारा :स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीला 21 तारखेला सकाळी साडेसात वाजता सुरुवात ( Local Body Elections 2021 ) झाली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी सुद्धा त्यांच्या सुकळी गावात सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला. तर या निवडणुकीमध्ये बंडखोरी ( Bhandara Congress Rebellion ) करणाऱ्या 5 काँग्रेसी पदाधिकाऱ्यांना सहा वर्षासाठी निलंबित ( Congress office bearer suspended ) केले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या भंडाऱ्यात काँग्रेसमध्ये बंडखोरी उफाळली, पाच पदाधिकारी सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित


प्रदेशाध्यक्षांच्या गृहजिल्ह्यात बंडखोरी

निवडणुका आल्या म्हणजे बंडखोरी ही बरेचदा पाहायला मिळते. भंडारा जिल्ह्यातही सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ( Bhandara Local Body Election 2021 ) काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केली आहे. ठाणा क्षेत्रातील अधिकृत काँग्रेस उमेदवाराचा प्रचार न करता अपक्ष उमेदवाराच्या प्रचार या 5 पदाधिकाऱ्यांनी केला. त्या 5 पदाधिकाऱ्यांना मध्यरात्री नाना पटोले यांनी केले 6 वर्षासाठी केले निलंबित केल्याचे पत्र काढले आहे. यामध्ये काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष राजकपूर राऊत, सुभाष वाडीभस्मे, माजी जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग निशाने, सचिव भंडारा काँग्रेस कमिटी मुन्ना भोंगाडे, जितेंद्र पडोळे आदींचा समावेश आहे. ठाना परसोडी जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये जुन्या काँग्रेस उमेदवाराला उमेदवारी न देता भाजपा आयात व्यक्तीला उमेदवारी दिल्याने जुन्या काँग्रेसी व्यक्तिनी नानां विरोधात ही बंडखोरी केली असल्याने आज हा विषय चर्चेचा ठरला आहे.

मतदानाचा हक्क बजावला

नाना पटोले यांनी सुकळी येथील आपल्या गावात कुटुंबासह मतदान केले. भाजपाद्वारे जनता त्रस्त झाली असल्याने त्यांना काँग्रेस हाच एकमेव पर्याय जनतेपुढे आहे. जनता काँग्रेसलाच मतदान करणार असल्याच्या विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. तर पक्ष विरोधी कारवाई करणाऱ्या व्यक्तिवर निलंबनाची कारवाई केल्याचे व्यक्तव नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details