भंडारा - संपूर्ण देशात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. भंडारा जिह्यातही रामनवमी मोठ्या धूम धड्याक्यात साजरी झाली. यानिमित्त शोभा यात्रा काढण्यात आल्या. शहरातील शोभा यात्रेची पूजा पोलीस उपअधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या हस्ते करण्यात आली.
भंडाऱ्यात रामनवमी उत्साहात साजरी - gandhi chowk
भंडारा शहरात सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान बहिरंगेश्वर मंदिरातून भगवान श्रीराम आणि माता सीता यांच्या मूर्ती एका विशिष्ट रथावर ठेवून सर्वप्रथम त्यांची उपअधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या हस्ते पूजा अर्चा करण्यात आली. त्यानंतर गावातील प्रतिष्ठित लोकांनी हा रथ ओढत नेण्यास सुरुवात केली.
भंडारा शहरात सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान बहिरंगेश्वर मंदिरातून भगवान श्रीराम आणि माता सीता यांच्या मूर्ती एका विशिष्ट रथावर ठेवून सर्वप्रथम त्यांची उपअधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या हस्ते पूजा अर्चा करण्यात आली. त्यानंतर गावातील प्रतिष्ठित लोकांनी हा रथ ओढत नेण्यास सुरुवात केली. शहराच्या विविध ठिकाणावरून शोभा यात्रा गांधी चौकात पोहचताच रामाची शोभा यात्रा पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी शेकडो नागरिक जमले होते. चौकात पोहचताच भृशुंड ढोल पथकाने सादर केलेल्या कला प्रदर्शनाने भक्तांना मंत्रमुग्ध करून टाकले, संपूर्ण परिसरात जय श्रीरामचा जयघोष सुरु होता.
भगवान श्रीराम यांच्या रथाला महिलांनीही ओढत नेत जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. या शोभायात्रेत वेगवेगळ्या झाक्या होत्या. काही देखावे रामायणावर तर काही झाक्या सामाजिक संदेश देणाऱ्या होत्या. हे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोक जमले होते. या झाक्यामध्ये सर्वात वेगळी झाकी होती ती हातात झाडू घेऊन कचरा साफ करण्याची लोकांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. तर या झाक्याच्या सर्वात मागे हाती ती रामनवमीच्या नावाने डीजेच्या तालावर बेधुंद होऊन तरुणाई नाचत होती.