भंडारा - हवामान खात्याने 6, 7 आणि 8 या तीन दिवसात भंडारा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होईल असा अंदाज वर्तवला होता. त्यात 6 आणि सात या दोन दिवसात जिल्ह्यात पाऊस बरसला नाही. मात्र, 8 तारखेला सकाळपासूनच पावसाने कधी रिमझिम तर कधी रिपरिप आणि कधी जोरदार बॅटिंग केली आहे.
महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. मात्र, भंडारा जिल्ह्यात आत्तापर्यंत केवळ 78 टक्केच पाऊस पडलेला आहे. यापैकी एकट्या पवनी तालुक्यात 113 मिमी पावसाची नोंद झाली. मात्र, बाकी इतर जिल्ह्यांमध्ये 55 ते 70 टक्क्यांच्या दरम्यान पाऊस झालेला आहे.