भंडारा- जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने अनेक भागात पाणी साचले आहे. लाखांदूर तालुक्यातील एका शाळेच्या पटांगणात आणि पवनी तालुक्याच्या एका शाळेच्या पटांगणात पाणी साचले होते. त्यामुळे शाळेला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे विद्यार्थांचे नुकसान होत आहे.
मागील दोन दिवसात पवनी आणि लाखांदूर तालुक्यता अतिवृष्टी झाली आहे. पवनी तालुक्यात 106 मिमी तर, लाखांदूर तालुक्यात 67 मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणीच पाणी साचले आहे. याच पावसाचा फटका या दोन्ही तालुक्यातील 2 शाळांनाही बसला आहे. लाखंदूर तालुक्यातील विरली येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगनात पाणी साचले आहे. इमारतीच्या एका बाजूला छोटेखानी तलाव तर आवार भिंतीच्यालगत नाला असल्याने पावसाच्या पाण्याने या नाल्यातील पुराचे पाणी भिंतींच्या खालून शाळेच्या प्रांगनात शिरले आहे,