महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडारा : रिसॉर्टवर छापा टाकत जुगार खेळणाऱ्या 15 जणांना अटक; 34 लाखांचा मुद्देमालही जप्त - nature pride resort ravanwadi

पोलीस अधीक्षक वसंत जाधव याना एका रिसॉर्टमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने तीन पथक तयार करून 10 तारखेच्या रात्री 1 वाजेला रावणवाडी येथील नेचर प्राईड रिसॉर्टवर छापा टाकला.

raid on resort in bhandara, 15 gamblers arrested by lcb
रिसॉर्टवर छापा टाकत जुगार खेळणाऱ्या 15 जणांना अटक

By

Published : Jun 11, 2021, 7:23 AM IST

Updated : Jun 11, 2021, 9:01 AM IST

भंडारा -स्थानिक गुन्हे शाखेने मध्यरात्री जुगार अडड्यावर छापा टाकत 15 जणांना अटक केली. अड्याळ पोलीस ठाण्यांतर्गत रावणवाडी येथील नेचर प्राईड रिसॉर्ट येथे ही कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान, 34 लक्ष 78 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर चार लोक अजूनही फरार आहेत.

याबाबत पोलीस निरीक्षक जयवंत चौहान माहिती देताना

रात्री 1 वाजताच्या दरम्यान छापा -

पोलीस अधीक्षक वसंत जाधव याना एका रिसॉर्टमध्ये जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भंडारा स्थानिक गुन्हे शाखेने तीन पथक तयार करून 10 तारखेच्या रात्री 1 वाजेला रावणवाडी येथील नेचर प्राईड रिसॉर्टवर छापा टाकला. रिसॉर्टमध्ये जुगाराचा डाव रंगला होता. पोलिसांनी या सर्व जुगार खेळणाऱ्या लोकांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून जुगारात खेळत असलेल्या नगदी दोन लाख रुपये 14 मोबाईल जप्त केले. तसेच पाच चारचाकी वाहनही या तपासात जप्त करण्यात आले.

हेही वाचा -Manhole Horror उघड्या गटारात पडल्या २ महिला, बघा हृदयाचा थरकाप उडवणारं सीसीटीव्ही फुटेज

अटक झालेल्या लोकांमध्ये नागपुरातील लोकांचा समावेश -

  1. मोरेश्वर सोरते (47 वर्ष, रा. मौदा)
  2. रमेश पराडकर (35 वर्ष, रा. रेशीमबाग, नागपूर)
  3. प्रशांत ढेंगरे (54 वर्ष, रा. रामेश्वरी, नागपूर)
  4. राधेश्याम निनावे (46 वर्ष, रा. मौदा)
  5. रवींद्र सवाईतुल (29 वर्ष, रा. रामबाग कॉलनी, नागपूर)
  6. महेश बरगट (48 वर्ष, रा. सुभाष वार्ड, रामटेक)
  7. अक्षय अडीकने (24 वर्ष, जुनी मंगळवारी, नागपूर)
  8. अभय जाधव (29 वर्ष, रा. महल नागपूर)
  9. कमलेश कावडे (31 वर्ष, रा. नाथ नगर मौदा)
  10. अतुल रामटेके (31 वर्ष, रा. फुल मोगरा, भंडारा)
  11. नरेश तिडके (35 वर्ष, रा. तांडेश्वर वार्ड पवनी)
  12. परमानंद नंदेश्वर (48 वर्षे, रा. सालेभाटा, तालुका लाखणी (रिसॉर्ट मॅनेजर)
  13. अश्विन मेश्राम (24 वर्ष, रा. ताडेश्वर वार्ड, पवनी)
  14. प्रवीण टिल्लू (40 वर्ष, हसनबाग प्रभू नगर नागपूर)
  15. सुखदेव श्रीरामजी मस्के (41 वर्ष, गडेगाव ता. लाखणी), यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला येथे जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात कारवाई अटक झालेले बहुतांश लोक हे नागपूर जिल्ह्यातील आहेत.

रावणवाडी हे पर्यटन क्षेत्र आहे. या पर्यटन क्षेत्रामध्ये बांधलेल्या रिसॉर्ट किंवा हॉटेलमध्ये बऱ्याच अवैध गोष्टी होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आहेत. भविष्यात या सर्वांवर ही कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चौहान यांनी दिली आहे.

हेही वाचा -Magnet Man नाशिकच्या या व्यक्तीच्या शरीराला चिकटतात लोखंडी वस्तू, लस घेतल्यानंतर सुरू झाला प्रकार

Last Updated : Jun 11, 2021, 9:01 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details