महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील 48 जणांचे अहवाल निगेटिव्ह, 'तिला' लागण कशी झाली हे कोडेच - corona bhandara news

या महिलेवर क्षयरोगावरीला उपचार सुरू होते. आरोग्य विभागाचे लोक तिच्या घरी जाऊन नियमित तपासणी करत होते. मात्र, तिला श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने तिला विशेष कक्षात उपचारासाठी भरती करण्यात आले आणि तिच्या घशातील नमुने चाचणीकरता पाठवण्यात आले ज्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे, ती कोणाच्या संपर्कात आल्याने तिला कोरोणाची लागण झाली, हा प्रश्न निर्माण झाला असून याचे उत्तर देण्यास प्रशासकीय यंत्रणा सध्या टाळाटाळ करीत आहे.

लोकेशन - भंडारा
लोकेशन - भंडारा

By

Published : Apr 30, 2020, 3:20 PM IST

Updated : Apr 30, 2020, 4:33 PM IST

भंडारा - जिल्ह्यातील प्रथम कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या महिलेच्या संपर्कातील अती धोक्याच्या १५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच कमी धोक्याच्या आलेल्या सर्व ३३ नमुन्यांचा अहवालही निगेटिव्ह आल्याने जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, त्यानंतर या महिलेला कोरोनाची लागण कशी आणि कोणामुळे झाली, ती महिला खरंच कोरोनाबाधित आहे, की दुसऱ्याचे रिपोर्ट चुकून तिच्या नावाने आले असे बरेच प्रश्न निर्माण झाले असून त्याचे उत्तर शोधण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनापुढे आहे.

कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील 48 ही जणांचे अहवाल निगेटिव्ह

जिल्ह्यात २७ एप्रिल रोजी गराडा येथे कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर प्रशासनासह जिल्हावासी धास्तावले होते. बाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचा शोध प्रशासनाकडून घेण्यात आला. जवळपास १५ हायरिस्क म्हणजे अती धोक्याच्या व्यक्तींना शोधून काढत त्यांच्या घशातील नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. तर, १३० कमी धोक्यांच्या व्यक्तीचा शोध घेत त्यापैकी ३३ नमुने पाठविले होते. आज(गुरुवार) या सर्व नमुन्यांचा अहवाल आला असून सर्व अती धोक्याचे आणि कमी धोक्याच्या व्यक्तींचे सर्वच नमुने निगेटिव्ह आले आहेत. ही बाब जिल्हावासी आणि प्रशासनासाठी दिलासा देणारी असली तरी आता प्रशासनापुढील आव्हान वाढले आहे. गराडा सारख्या ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला कसा, हे शोधणे प्रशानसासाठी तारेवरची कसरत ठरणार आहे.

दरम्यान, या महिलेवर क्षयरोगावरीला उपचार सुरू होते. आरोग्य विभागाचे लोक तिच्या घरी जाऊन नियमित तपासणी करत होते. मात्र, २३ तारखेला तिला श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने तिला विशेष कक्षात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. त्यानंतर, या महिलेच्या घशातील नमुने तपासणीकरता नागपूरला पाठवण्यात आले. सोमवारी त्याचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला. यानंतर, प्रशासनाने आधी तिला भेटायला येणाऱ्या, तिच्या सोबत राहणाऱ्या तसेच ती ज्या रुग्णालयात उपचारासाठी गेली होती त्या डॉक्टर, नर्स, मदतनीस, रुग्ण अशा 150 लोकांची यादी तयार केली. तसेच, त्यातील हायरिस्क आणि लो रिस्कचे अहवाल तपासणीसाठी पाठविले होते. तेही निगेटिव्ह आले मग ही महिला कोरोनाबाधित झालीच कशी याचे उत्तर देण्यास प्रशासकीय यंत्रणा सध्या टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाले आहे.

Last Updated : Apr 30, 2020, 4:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details