महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडारा जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचे जोरदार आगमन - Heavy rain in bhandara

29 मे 2 जून या कालावधीत तासी 30 ते 40 किमी वाऱ्यासह पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवित रविवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली.

Rain before mansion in bhandara
भंडारा मान्सूनपूर्व पाऊस

By

Published : May 31, 2020, 10:14 PM IST

भंडारा -हवामान खात्यांने वर्तविला अंदाजानुसार जिल्ह्यात रविवारी वादळ, वारा आणि विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाचे जोरदार आगमन झाले. या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. तर पावसाला सुरुवात होताच वीज खंडित झाला होता.

29 मे 2 जून या कालावधीत तासी 30 ते 40 किमी वाऱ्यासह पाऊस येण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवित रविवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. दिवसभर नेहमीप्रमाणे मे महिन्यातील कडक उन्ह तापत असल्यामुळे सायंकाळी पाऊस येईल, असे वातावरण नव्हते. मात्र, सायंकाळी वातावरणात बदल झाला आणि सहा वाजेच्या दरम्यान पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. सुरुवातीला पाच ते दहा मिनिटे पावसाच्या सरी बरसल्यानंतर पाऊस थांबला. मात्र, अर्ध्या तासानंतर सुसाट वादळ वाऱ्याला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह पावसाने पुन्हा हजेरी लावली. जवळपास एक तास कधी मध्यम तर कधी मुसळधार स्वरुपात पाऊस झाला.

या पावसामुळे मागील 15 दिवसांपासून सुरू असलेला उकाड्यापासून काही प्रमाणात का होईना नागरिकांना सुटका मिळेल. तसेच ज्या बोअरवेलमध्ये पाण्याची पातळी कमी झाली होती त्यांना नक्कीच दिलासा मिळेल.
यावर्षी पाऊस हा वेळेवर येणार असल्याचे हवामान खात्याने अंदाज वर्तविल्यामुळे शेतकरी राजा शेतीच्या मशागतीला लागला आहे. आजच्या या पावसाने हवामान खात्याचे पुढच्या अंदाजही खरे ठरतील, या आशेने शेतकरी आनंदित झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details