भंडारा -आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारी प्रहार जनशक्ती पक्षाद्वारे भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा प्रमुख मंगेश वंजारी यांनी केले आहे. जवळपास 50 पुरुष आणि महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने जेलभरो आंदोलन - Prahar protest in Bhandara
शासनाच्या चुकीच्या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत असुन त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिति बिकट बनत चालली आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाद्वारे जेलभरो आंदोलन करण्यात आले आहे.
शासनाच्या चुकीच्या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिति बिकट बनत चालली आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाद्वारे जेलभरो आंदोलन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी तात्काळ देण्यात यावी, पीक विम्याची रक्कम अजूनही मिळाली नाही, ती तत्काळ देण्यात यावी, जिल्ह्यात दुष्काळ घोषित करून त्याप्रमाणे आर्थिक मदत शेतकऱ्यांना द्यावी, शेतीच्या पेरणी आणि रोवणी कामाचा समावेश मनरेगा अंतर्गत करण्यात यावा. अपंग बांधवांना मिळणारे मानधन 600 रुपये ऐवजी 5000 करावा, गोसे खुर्द प्रकल्प बाधित लोकांच्या मागण्याची पूर्तता करावी या प्रमुख मागण्यांसह 15 विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले होते.
आंदोलनकर्त्यांनी सुरुवातीला सभा घेऊन आपल्या मागण्या विषयी प्रशासनाला सांगितले. नंतर या विषयीचे निवेदन जिल्ह्याधिकारी यांना दिल्यानंतर प्रहार संघटनाच्या कार्यकर्त्यांनी जेल भरो आंदोलन करीत स्वतःला अटक करून घेतली. येणाऱ्या काळात जर सरकारने मागण्या पूर्ण केल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्याच्या इशाराही देण्यात आला आहे.