महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'कोरोनो'च्या अफवेमुळे कुक्कुटपालन संकटात, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्यावसायिकांचे उपोषण - कोरोना व्हायरस

कोरोनो व्हायरसच्या अफवेमुळे कुक्कुटपालन हा व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे. यासाठी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांनी उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा तिसरा दिवस आहे.

Bhandara
'कोरोनो'च्या अफवेमुळे कुक्कुटपालन संकटात

By

Published : Feb 26, 2020, 5:00 PM IST

भंडारा- चिकनमुळे कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते, अशा प्रकारची अफवा पसरल्यामुळे चिकन खाणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली. त्यामुळे याचा कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे या नुकसानाबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी, यासाठी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांनी उपोषण सुरू केले आहे. आज या उपोषणाचा तिसरा दिवस आहे.

'कोरोनो'च्या अफवेमुळे कुक्कुटपालन संकटात

कोरोनो व्हायरसच्या अफवेमुळे कुक्कुटपालन हा व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे. कुक्कुटपालनाच्या व्यवसायासाठी बँकेकडून कर्ज काढण्यात आले आहे. मात्र, आता एवढा खर्च करून कोरनो व्हायरसच्या अफवेमुळे चिकन 40 रूपये किलोने विकण्याची वेळी कुक्कुटपालन करणाऱ्यांवर आली आहे. त्यामुळे या कोंबड्यांचा सांभाळ कसा करायचा हा प्रश्न व्यावसायिकांसमोर आहे. कोंबडीच्या पिल्लाला मोठे करण्यासाठी 120 रुपयापर्यंत खर्च होतो. मात्र, आता 40 रुपयांत कोंबडी विकावी लागत असल्याने हा व्यवसाय संकटात सापडला आहे. त्यामुळे संकटात असलेल्या व्यावसायिकांना मदतीचा हात देण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्यावसायिक कोंबड्या घेऊन उपोषणाला बसले आहेत.

कुक्कुटपालन हा शेतकऱ्यांचा जोडधंदा आहे. त्यामुळे कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने 25 लाखाची मदत करावी, विक्रीसाठी तयार असलेला माल सरकारने खरेदी करावा, बाहेरुन होणारी कोंबड्यांची आयात बंद करावी, प्रसारमाध्यमांवर पसरलेल्या खोट्या अफवा थांबविण्यासाठी प्रतिबंधक कारवाई करावी, अशा मागण्या या व्यावसायिकांनी केल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details