भंडारा - जिल्ह्यात 21 तारखेला होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदानासाठी ( Local Body Elections ) आज ( सोमवारी ) मतदान पथके ( Polling Squads ) रवाना झाले आहेत. जिल्हा परिषद, 7 पंचायत समिती आणि 3 नगरपंचायतीच्या ( Zilla Parishad, 7 Panchayat Samiti and 3 Nagar Panchayat ) पहिल्या टप्प्यातील निवडणुका उद्या (मंगळवारी) होणार आहेत. 1,322 मतदान केंद्रासाठी 5,951 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती ( Appointment of 5,951 Officers and Staff ) करण्यात आलेली आहे. तसेच अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या मतदान केंद्रावर नेण्यासाठी खासगी शाळेतील बसेस आणि खासगी वाहनांचा उपयोग करण्यात आलेला आहे.
- पोलीस मैदानावर झाले मतपेट्यांचे वाटप
21 तारखेला होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी भंडारा जिल्हा पोलीस ( कार्यालयाच्या पटांगणावर 20 तारखेला सकाळी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस विभागातील कर्मचारी जमले होते. मतदान केंद्रानुसार वेगवेगळे कक्ष निर्माण करून केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतपेट्या आणि मतदान साहित्य देण्यात आले. या मत पेट्यांची, मतदान साहित्यांचे व्यवस्थित तपासणी करून हे सर्व अधिकारी आणि कर्मचारी मतदान केंद्रासाठी निघाले आहेत. त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी 1, 332 मतदान केंद्राची निर्मिती केली असून या मतदानावर 131 क्षेत्रीय अधिकारी, 1,455 मतदान केंद्राध्यक्ष आणि 4,365 मतदान अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
- पोलीस विभाग सज्ज