भंडारा- धान्य दुकानातील धान्य गरजूंना न वाटता परस्पर विल्हेवाट लावत व्यापाऱ्यांना विकण्यासाठी वाहतूक करताना रेशन दुकानदाराला आणि गाडी चालकाला पकडून दोघांविरुद्ध पवनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवनी येथून 6 किमी अंतरावर असलेल्याल कोरंभी येथील सरकारी स्वस्त स्वस्त धान्य दुकानदार श्रीमती मंदाबाई किशोर वाघमारे (वय 70 वर्षे राह. कोरंभी) यांनी टाटा एस क्रमांक एम एच 36 एफ 1084 चा चालक शिवदास हरिदास निंबेकर (वय 29 वर्षे रा. वाही, तह पवनी, जिल्हा भंडारा) यांचे सोबत संगनमत करून गाडीत धान्याची 31 पोती भरून पवनीकडे येत असल्याची माहिती नायब तहसीलदार कांबळे याना मिळाली. कांबळे यांनी पवनी पोलिसांसह संयुक्त कार्यवाही करीत पवनी- कोरंभी रोडवरील बावनकर राईस मिल जवळ चालकाला थांबवून चौकशी केली असता, हा सर्व तांदूळ रेशन दुकानातील असल्याचे समोर आले.
रेशन दुकानातील धान्य व्यापाऱ्याला विकण्यासाठी वाहतूक करणाऱ्याला अटक
धान्य दुकानातील धान्य गरजूंना न वाटता परस्पर विल्हेवाट लावत व्यापाऱ्यांना विकण्यासाठी वाहतूक करतांना रेशन दुकानदाराला आणि गाडी चालकाला पकडून दोघांविरुद्ध पवनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
police arrested a person in ration fraud case pawani bhandara
नायब तहसीलदार हेमंत बाजीराव कांबळे यांचे तक्रारी वरून पवनी पोलिसात कलम 406, 34 भादवी सहकलम 3 अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून या कार्यवाहीत रु 7750 चे धान्य तर गाडीची किंमत रु 1 लाख असे एकूण 1,07,750 रुपयांच्या मुद्देमालासहित चालक शिवदास याला अटक करण्यात आली असून पुढील तपास पवनी पोलीस करीत आहे.