महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाळू माफियांचे धाबे दणाणले; दोन दिवसात अवैध वाळू तस्करीच्या 10 ट्रक पकडल्या

तुमसर तालुक्यात अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या 11 ट्रकवर कारवाई करण्यात आली आहे. तहसीलदार व स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत वाळू व ट्रक मिळून एकूण 1 कोटी 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तुमसर तालुक्यात अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या 11 ट्रक्सवर कारवाई करण्यात आली आहे.

By

Published : Sep 27, 2019, 9:02 AM IST

भंडारा- तुमसर तालुक्यात अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या 11 ट्रकवर कारवाई करण्यात आली आहे. तहसीलदार व स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत वाळू व ट्रक मिळून एकूण 1 कोटी 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संपूर्ण जिल्ह्यात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असून, सर्वच अवैध गोष्टींवर आळा घालण्याचा प्रयत्न सुरू आहे.

तुमसर तालुक्यात अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या 11 ट्रक्सवर कारवाई करण्यात आली आहे.

सध्या रेती घाट बंद आहेत; तरीही मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध असल्याने तुमसर तालुक्याचे तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांनी बुधवारी (दि.२५सप्टेंबर)ला खापा चौकात अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या 5 गाड्यांवर कारवाई केली होती.

हेही वाचा चाळीसगाव पोलीस ठाण्यात जप्त केलेल्या वाळूच्या ट्रॅक्टरवर उगवली गांज्याची रोपे

तसेच गुरुवारी (दि.२६सप्टेंबर)ला गस्तीवर असणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना ट्रक्समध्ये रॉयटी नसलेली वाळू सापडली. यावेळी त्यांनी तहसिलदारांना पाचारण करून या तस्करीविरोधात गुन्हा दाखल केला.
या दोन्ही ठिकाणच्या कारवाईत ट्रक मालकांना 25 लाखांचा दंड ठोठवण्यात आला असून, यामध्ये एकूण वाळू आणि ट्रक मिळून एकूण 1 कोटी 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details