भंडारा- जिल्ह्यात भागवत सप्ताहाच्या महाप्रसादाचे सेवन केल्यामुळे तब्बल ८० पेक्षा जास्त जणांना विषबाधा झाल्याची घटना उघडकीस आली आहे. लाखांदूर तालुक्यातील रोहिणी या गावात ही घटना घडली आहे. विषबाधा झालेल्या रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
भंडाऱ्यात महाप्रसादातून 80 पेक्षा अधिक भाविकांना विषबाधा - Bhandara latest news
रोहिणी गावात भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचा समारोप महाप्रसादाने करण्यात आला. मात्र, हा महाप्रसाद खाल्ल्यानंतर ग्रामस्थांना उलट्या, हगवण व मळमळ सुरू झाली.
भाविकांना विषबाधा
रोहिणी गावात भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचा समारोप महाप्रसादाने करण्यात आला. मात्र, हा महाप्रसाद घेतल्यानंतर ग्रामस्थांना उलट्या, हगवण व मळमळ सुरू झाली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. जवळपास ४० रुग्ण लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत, तर काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Last Updated : Jan 6, 2020, 3:27 PM IST