महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडाऱ्यात 'प्लाझ्मा दान शिबिराचे' आयोजन; जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार - प्लाझ्मा दान शिबिर भंडारा

कोरोना आजारातून बरे होण्यासाठी प्लाज्मा हा उपयुक्त ठरतो. मात्र, भंडारा जिल्ह्यात प्लाज्मा काढण्याची मशीन नसल्याने प्रत्येक वेळेस प्लाजमासाठी नागपूरच्या फेऱ्या घालाव्या लागत होता. त्यातही प्लाज्माचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याने ते मिळविणे अतिशय कठीण जात होते. ही बाब जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या लक्षात आल्यानंतर यावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन केले. एवढेच नव्हे तर कोरोनामुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनाही प्लाजमा दान करण्याचे आवाहन केले.

भंडाऱ्यात 'प्लाझ्मा दान शिबिराचे' आयोजन; जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार
भंडाऱ्यात 'प्लाझ्मा दान शिबिराचे' आयोजन; जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

By

Published : Dec 19, 2020, 10:58 AM IST

भंडारा- जिल्हा सामान्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना प्लाझमा आणि रक्तसाठा अपुरा पडत असल्याने गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात येताच जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आपल्या कार्यालयात प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरास शासकीय कर्मचाऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला.

राज्यातील सर्वात मोठे प्लाझ्मा दान शिबिर

या शिबिरात आत्तापर्यंत 65 लोकांनी प्लाझ्मा दान केला असून अजून काही जण प्लाज्मा दान करणार आहेत. त्यामुळे हा आत्तापर्यंतचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लाज्मा दान शिबिर ठरणार आहे.

भंडाऱ्यात 'प्लाझ्मा दान शिबिराचे' आयोजन; जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

शासकीय रुग्णालयातील रुग्णांना विनामूल्य प्लाझ्मा

कोरोना आजारातून बरे होण्यासाठी प्लाज्मा हा उपयुक्त ठरतो. मात्र, भंडारा जिल्ह्यात प्लाज्मा काढण्याची मशीन नसल्याने प्रत्येक वेळेस प्लाजमासाठी नागपूरच्या फेऱ्या घालाव्या लागत होता. त्यातही प्लाज्माचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याने ते मिळविणे अतिशय कठीण जात होते. ही बाब जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या लक्षात आल्यानंतर यावर तोडगा काढण्यासाठी त्यांनी प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन केले. एवढेच नव्हे तर कोरोनामुक्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनाही प्लाजमा दान करण्याचे आवाहन केले.

भंडाऱ्यात 'प्लाझ्मा दान शिबिराचे' आयोजन; जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार

प्लाझ्मा दान करण्याऱ्यांच्या संख्येत वाढ

आवाहनाला प्रतिसाद देत शिबिराच्या पहिल्याच दिवशी 147 जणांनी नोंदणी केल्या. सुरुवातीला नोंदणी केलेल्यांची आर बी डी आणि अँटीबॉडी तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ६५ जणांमध्ये अँटीबॉडी तयार झाल्यााचे निष्पण्ण झाले. शुक्रवारी पुन्हा पंचवीस लोकांनी तपासणी करून घेतली असून यापैकी 18 लोक प्लाज्मा देण्यासाठी योग्य असल्याचे निष्पण्ण झाले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी केले रक्तदान

नागपूर येथील लाईफ लाईन ब्लड बँकेचे डॉक्टर हरीश वरभे यांच्या देखरेखेखाली शिबराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रक्तदान तर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी प्लाज्मा दान करून सर्वांचे मनोबल वाढविले.

ABOUT THE AUTHOR

...view details