भंडारा - जिल्ह्यात आता लग्न सोहळे आणि संबंधीत कार्यक्रम पार पाडता येणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी तसा आदेश काढला आहे. मात्र, यासाठी पुर्व परवानगीची अट घातली गेली आहे. केवळ 20 लोकांची उपस्थिती आणि शासकीय परवानगी घेऊनच लग्न सोहळे पार पाडता येतील, असा आदेश बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी काढला. या आदेशामुळे लॉकडाऊनमुळे तात्पुरते स्थगित केलेली लग्न पार पाडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हेही वाचा...भंडारा जिल्ह्यात वाळू माफियांचा तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला; टिप्पर चालक, मालक फरार
2020 मध्ये लग्नाचे स्वप्न रंगवणाऱ्या असंख्य तरुण-तरुणींच्या स्वप्नांवर कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पाणी फेरले होते. अनेकांना लग्नाचे बेत पुढे ढकलावे लागले, काहींना लग्नच रद्द करावी लागली होती तर अनेकांनी अगदी चार माणसांच्या उपस्थितीत लग्न आटोपले. एकंदरीत बऱ्याच तरुण तरुणींच्या स्वप्नांचा खोळंबा लॉकडाऊनमुळे झाला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या नव्या आदेशाने भंडारा जिल्ह्यातील अनेक तरुण-तरुणींना लग्न करता येणार आहे. यासाठी काही बंधने प्रशासनाने घातली आहेत.