भंडारा- साकोली विधानसभा मतदारसंघ सध्या जिल्ह्यातील सर्वात चर्चचा मतदारसंघ आहे. कारण, या मतदारसंघामध्ये काँग्रेसतर्फे नाना पटोले हे उमेदवार आहेत. नाना पटोले यांनी भाजपमध्ये खासदार असताना नरेंद्र मोदींवर सडकून टीका करीत भाजपला रामराम ठोकला होता. त्यामुळेच मोदींनी इथे सभा घेतल्याचे बोलले जात आहे.त्यांच्या भाषणानंतर तिथे आलेल्या लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्यामध्ये प्रचारासाठी आले होते. साकोली विधानसभा मतदारसंघ सध्या भंडारा जिल्ह्यातील सर्वात चर्चचे मतदारसंघ आहे. कारण, या मतदारसंघामध्ये काँग्रेसतर्फे नाना पटोले हे उमेदवार आहेत. नाना पटोले भाजपमध्ये खासदार असताना नरेंद्र मोदींवर सडकून टीका करीत भाजपला रामराम ठोकला होता. साकोली हा नाना पटोले यांचा गड असल्याने भाजपने साम, दाम, दंड, भेद वापरून नाना पटोले यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा मात्र या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाना पटोले यांच्या नावाचा उल्लेखही केला नाही.
हेही वाचा - मोदींच्या सभेला दुचाकीवर पाच-पाच जण या, कोणी अडवल्यास माझं नाव सांगा; भाजप नेत्याचे बेताल वक्तव्य