भंडारा : उपविभागीय अधिकारी यांना मारहाण करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्यां पवनी पोलिसांचा आरोपी सोबतचा मटण पार्टी करतांना व्हिडीयो व्हायरल झाला आहे. या व्हिडीयोतील पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. हा व्हिडियो भंडारा- पवनी विधानसभा क्षेत्राच्या आमदारांनी प्रसारमाध्यमांना दिला आहे.
Viral Video : आरोपींसोबत मटण पार्टी करणारे पोलिस निलंबित; पाहा व्हायरल व्हिडिओ - आमदार नरेंद्र भोंडेकर
उपविभागीय अधिकारी यांना मारहाण करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पवनी पोलिसांचा आरोपी सोबतच मटण पार्टी करतांना (Police mutton party with accused) व्हिडीयो व्हायरल (Viral Video) झाला आहे. त्यांना निलंबितही करण्यात आले आहे. हा व्हिडियो भंडारा- पवनी विधानसभा क्षेत्राच्या आमदारांनी प्रसारमाध्यमांना दिला आहे.
अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या आरोपींना पवनी पोलिस कसे पकडतील असा प्रश्न उपस्थित करत अशा पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक आमदारांनी केली आहे. ही पार्टी करतांना त्या पोलिस कर्मचाऱ्यांचे संभाषण मोठा धक्कादायक खुलासा करीत आहे. हे पोलीस आरोपी वाळूमाफियांनी पोलीस अधीक्षकांना विचारले असता चौकशीचे आदेश दिले असून अहवाल आल्यावर कार्यवाही करू असे त्यांनी सांगितले. आता या पोलिसांचे निलंबन करण्यात आले असून, पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी आदेश काढला आहे. यामध्ये खाकी वर्दीमध्ये पोलीस हवालदार दिलीप धावडे, वाहतूक ड्रेस परिधान केलेला पोलीस शिपाई खुशांत कोचे, आणि हिरव्या रंगाच्या ड्रेसमधील पोलीस शिपाई राजेंद्र लांबट यांचा समावेश आहे.
व्हिडिओतील संभाषण धक्कादायक
भंडारा उपविभागीय अधिकारी यांच्यावर वाळूमाफियांनी 27 तारखेला पहाटे 3.30 ला हल्ला केल्यानंतर त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित आरोपींना शोधून काढण्याचे काम ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना दिले होते. पोलिसांना आरोपी मिळाले. तरीही पकडून आणण्यापेक्षा पोलिसांचा त्या आरोपींसह मटण पार्टी करतांनाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीयोमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडीयोमधील वर्दीवर असलेला पोलीस कर्मचारी हा आरोपींना मोठ्या बतावण्या करीत आहे. अशा पद्धतीचे किरकोळ हल्ले आणि होणाऱ्या गुन्ह्यांची तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी अगोदर तुमसरमध्ये कार्यरत असताना बऱ्याच आरोपींचे नाव हे गहाळ झाल्याचाही धक्कादायक खुलासा यात केला आहे. माझी पाहिल्यापासून तुम्हाला मदत करण्याची भूमिका आहे. जे झाले ते झाले विसरून जा काळजी करू नको असे तो आरोपींना सांगत आहे. तसेच आय जी आणि इतर अधिकाऱ्यांचा ही तो उल्लेख करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक आणि पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी
व्हिडिओ भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी तो माध्यमांना दिला. भंडारा उपविभागीय अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याचा त्यांनी निषेध केला असून या हल्ल्यानंतर आरोपीची संगनमत करून पार्टी करणाऱ्या पोलीस प्रशासनाच्या कामावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहे. याविषयी गृहमंत्री, मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले असून वाळू माफियावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याविषयी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी निलंबनाचा आदेश काढला आहे.
हेही वाचा -State Election Commission : जून-जुलै महिन्यात राज्यात होऊ शकतात निवडणुका; निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र