भंडारा- जिल्ह्याचे पालकमंत्री आणि साकोली विधानसभेचे उमेदवार परिणय फुके तसेच भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांनी मतदानाचा हक्क बजावला. परिणय फुके मूळचे नागपूरचे आहेत आणि सध्या साकोली विधानसभा क्षेत्रातून उमेदवार आहेत.
राज्यात युतीचीच सत्ता येणार, राज्यमंत्री परिणय फुके यांनी व्यक्त केला विश्वास - bhandara election
जिल्ह्याचे पालकमंत्री आणि साकोली विधानसभेचे उमेदवार परिणय फुके यांनी मतदानाचा हक्क बजावला.भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिह्यातील 7 ही भाजपचे उमेदवार निवडून येतील आणि राज्यात पुन्हा युतीची सत्ता येणार, असा विश्वास परिणय फुके यांनी यावेळी व्यक्त केला.
लोकसभेच्या निवडणुकीपासून परिणय फुके यांनी त्यांचे मतदान भंडारा येथे आणले होते आणि म्हणूनच त्यांनी त्यांचा मतदानाचा हक्क भंडारा येथील भगीरथ शाळेत बजावला. तर खासदार सुनील मेंढे यांनी त्यांचा मतदानाचा हक्क नूतन कन्या शाळेत बजावला.
भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील सातही भाजपचे उमेदवार निवडून येतील आणि राज्यात पुन्हा युतीची सत्ता येणार, असा विश्वास परिणय फुके यांनी यावेळी व्यक्त केला. तर आमच्या 230 जागा निवडून येतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली. यासोबतच माझ्या विरुद्ध असलेले नाना पटोले हे तिसऱ्या स्थानावर राहणार असून माझी लढत ही वंचित आघाडीच्या उमेदवारासोबत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.