भंडारा -जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी सहा तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. 23 जूनला केवळ भंडारा तालुक्यात 1 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला तर जिल्ह्यात 17 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58 हजार 235 झाली आहे. एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 59 हजार 446 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.96 टक्के आहे.
पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण केवळ 00.18
आतापर्यंत 58 हजार 235 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 59 हजार 446 झाली असून 86 सक्रिय रुग्ण आहेत. बुधवारी (दि. 23 जून) कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झाला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 1 हजार 125 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.96 टक्के आहे. तर पॉझिटिव्ह रेट 00.18 टक्के एवढा आहे. तर जिल्ह्याचा मृत्यूदर 01.89 टक्के एवढा आहे.