भंडारा- जिल्ह्यात सोमवारी पहिला कोरोनाचा रुग्ण आढळल्याने प्रशासन जागे झाले आहे. मंगळवारी जिल्ह्याधिकारी यांनी नवीन आदेश काढून भंडारा तालुक्यातील सर्व दुकाने आणि व्यावसाय पुढील आदेशापर्यंत बंद राहतील, असे सांगितले आहे. 21 तारखेनंतर सुरू करण्यात आलेल्या दुकानांपैकी आता केवळ जीवनावश्यक सेवा सुरू राहतील, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
भंडाऱ्यात केवळ जीवनावश्यक दुकाने राहणार सुरू, कोरोना रुग्ण आढळल्याने खबरदारी - first corona case in bhandara
जिल्ह्यात सोमवारी पहिला कोरोनाचा रुग्ण आढळल्याने प्रशासन जागे झाले आहे. मंगळवारी जिल्ह्याधिकारी यांनी नवीन आदेश काढून भंडारा तालुक्यातील सर्व दुकाने आणि व्यावसाय पुढील आदेशापर्यंत बंद राहतील, असे सांगितले आहे. 21 तारखेपासून भंडारा जिल्ह्यात बरीच दुकाने आणि उद्योग सुरू करण्याची परवानगी मुख्याधिकारी यांनी दिली होती.
नवा आदेश केवळ भंडारा तालुक्यासाठी लागू असून उर्वरित 6 तालुक्यांमध्ये जुन्या आदेशाप्रमाणेच दुकाने आणि उद्योग सुरू राहतील. 21 तारखेपासून भंडारा जिल्ह्यात बरीच दुकाने आणि उद्योग सुरू करण्याची परवानगी मुख्याधिकारी यांनी दिली होती. मात्र, कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्याने आता भंडाऱ्यात ही सर्वच दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मंगळवारी जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार भंडारा तालुक्यात केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकानेच सुरु राहणार आहेत. उर्वरित सर्व दुकाने ही पुढील आदेशपर्यंत बंद राहतील.