महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडाऱ्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, मुंबईहून अवैधरित्या आला होता शिवणीबांधमध्ये - corona cases in bhandara

हा तरुण मुंबईवरून साकोलीला पोहोचल्यावर आपल्या दोन मित्रांसह दुचाकीवरुन गावी गेला होता. त्यामुळे, सुरुवातीला त्याची माहिती प्रशासनाला मिळाली नाही. मात्र, नंतर त्याला होम क्वारंटाईन केले गेले. 18 तारखेला त्याचे सहकारी कोरोनाबाधित असल्याचे समोर येताच या तरुणाला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले गेले.

भंडाऱ्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण
भंडाऱ्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

By

Published : May 21, 2020, 12:45 PM IST

भंडारा- जिल्ह्यात बुधवारी आणखी एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वाढ झाली असून भंडाऱ्यातील एकूण रुग्ण संख्या 9 झाली आहे. यापैकी 1 रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे. तर, इतर 8 रुग्णांवर कोरोनाच्या विशेष रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज आढळलेला कोरोनाग्रस्त तरुण होम क्वारंटाईन होता. त्यामुळे, त्याच्या कुटुंबातील तीन लोक आणि दोन मित्रांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन केले गेले आहे.

भंडाऱ्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

सध्या रुग्ण राहात असलेला परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित झाला नसला तरी परिस्थितीनुसार याबद्दल विचार केला जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. साकोली तालुक्यातील शिवणीबांध गावातील हा 21 वर्षीय तरुण असून तो 18 तारखेला आढळलेल्या 4 कोरोनाबाधितांचा सहकारी आहे. हे सर्व जण 15 तारखेला अवैधरित्या मुंबईवरून ट्रकमधून प्रवास करुन साकोली येथे आले होते. यापैकी 4 जणांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले गेले होते. नंतर हे चारही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले.

कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी तयार केली गेली. त्यामध्ये या तरुणाचादेखील समावेश होता. हा तरुण मुंबईवरून साकोलीला पोहोचल्यावर आपल्या दोन मित्रांसह दुचाकीवरुन गावी गेला होता. त्यामुळे, सुरुवातीला त्याची माहिती प्रशासनाला मिळाली नाही. मात्र, नंतर त्याला होम क्वारंटाईन केले गेले. 18 तारखेला त्याचे सहकारी कोरोनाबाधित असल्याचे समोर येताच या तरुणाला इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले गेले. 19 तारखेला त्याच्या घशाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आणि 20 तारखेला तो कोरोनाबाधित असल्याचे समोर आले.

या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 5 जणांना तत्काळ इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले गेले आहे. तर, 20 लोकांना होम क्वारंटाईन केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी प्रदीपचंद्रन यांनी दिली. सध्या त्याच्या गावाला कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले गेले नाही. मात्र, हा तरुण होम क्वारंटाईन असताना गावात फिरला असल्यास त्यादृष्टीने विचार केला जाईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details