महाराष्ट्र

maharashtra

यवतमाळात आणखी एकाला कोरोनाची लागण; एकूण ॲक्टीव्ह रुग्ण 19

By

Published : May 31, 2020, 10:45 PM IST

शनिवारी रात्री पॉझिटिव्ह रुग्णाला घेऊन खाजगी रुग्णवाहिकेने एकूण पाच जण यवतमाळ येथे आले. येथे पोहचण्यापूर्वीच सदर रुग्णाचा मृत्यु झाला. या रुग्णवाहिकेत तीन चालक आणि मृताचा भाऊ यांचा समावेश होता. या चारही जणांना लगेच येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षात भरती करुन त्यांचे नमुने तपासणीकरिता पाठविले.

Yawatmal
यवतमाळ

यवतमाळ -रुग्णवाहिकेने मुंबईवरून मृत पॉझिटिव्ह रुग्णाला यवतमाळ येथे आणणार्या तीन चालकांपैकी एकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुणांची संख्या एकने वाढून 19 झाली आहे. सद्यस्थितीत वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 19 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आणि एक प्रिझमटिव्ह केससह एकूण 20 जण भरती आहेत.

शनिवारी रात्री पॉझेटिव्ह रुग्णाला घेऊन खाजगी रुग्णवाहिकेने एकूण पाच जण यवतमाळ येथे आले. येथे पोहचण्यापूर्वीच सदर रुग्णाचा मृत्यु झाला. या रुग्णवाहिकेत तीन चालक आणि मृताचा भाऊ यांचा समावेश होता. या चारही जणांना लगेच येथील संस्थात्मक विलगीकरण कक्षात भरती करुन त्यांचे नमुने तपासणीकरिता पाठविले. रविवारी सकाळी या तीन चालकापैकी एकाचा रिपोर्ट पॉझेटिव्ह आला. तर उर्वरीत तीन जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

मागील 24 तासांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला एकूण 16 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी एक पॉझिटिव्ह, 14 निगेटिव्ह तर एका रिपोर्टचे निदान अचूक नसल्यामुळे त्याला पुन्हा पाठविण्यात येणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाने आतापर्यंत 2065 नमुने तपासणीकरीता पाठविले. यापैकी एकूण 2060 प्राप्त झाले तर पाच रिपोर्ट अप्राप्त आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यात 1934 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सुरुवातीपासून आजपर्यंत बरे होऊन घरी जाणार्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 106 आहे. तर जिल्ह्यात एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्युची नोंद झाली आहे. यासोबत संस्थात्मक विलगीकरणात 22 आणि गृह विलगीकरणात एकूण 422 जण आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details