भंडारा - 11 बालकांच्या जळीतकांड प्रकरणी दोन नर्सचे अटकपूर्व जामिनासाठी अर्जावर सुनावनी झाली. नर्सेच्या अटक पूर्व जामिन रद्द करण्याची मागणी सरकारी वकीलांनी केली असून अधिक पुरावे सादर करण्यासाठी सरकारी वकीलांनी अधिक वेळ मागितला. त्यांमुळे भंडारा जिल्हा सत्र न्यायालय -1 चे विशेष न्यायाधीश पी. एस. खूने यांनी या प्रकरणी पुढील सुनावणी 26 फेब्रुवारीला होणार असल्याचे स्पष्ठ केले आहे. तो पर्यंत नर्सेस अंतरिम जामिन वर आहेत.
गुन्हा दाखल होण्यागोदारच घेतली होती अंतरिम जमानात- भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशु केअर युनिटमध्ये 8 जानेवारीच्या मध्यरात्री लागलेल्या आगीत दहा बालकांचा तर, त्यानंतर उपचारादरम्यान अन्य एका अशा 11 बालकांचा मृत्यू झाला. याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समितीच्या अहवालानंतर सात जणांवर कारवाई करण्यात आली. तर या गंभीर प्रकरणी कर्तव्यावरील स्मिता आंबीलढुके आणि शुभांगी साठवणे या दोन नर्सवर गुन्हेगारी स्वरूपाचा निष्काळजीपणा केल्याचा ठपका तपासाअंती ठेवत कलम 304 (पार्ट 2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा दाखल होण्यापूर्वीच स्मिता आंबीलढुके आणि शुभांगी साठवणे यांनी भंडारा येथील जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज होता. यात स्मिता 28 जानेवारी तर शुभांगी ला 29 जानेवारीला 18 फेब्रुवारी पर्यंत अंतरिम जामीन मिळाला होता. हा अंतरिम जामीन रद्द करून दोघींना ताब्यात द्यावे, अशी मागणी पोलिसांनी केली होती. त्यांच्या अर्जावर जिल्हा सत्र न्यायालय -1 चे विशेष न्यायाधीश पी. एस. खूने यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.
पुढील सूनवाई 26 तारखेला आहे-
यावेळी दोन्ही पक्षाकडून युक्तिवाद करण्यात आला असून यात काही महत्वाचे दस्तावेज सादर करण्यासाठी सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे वेळ मागितला. त्यामुळे यात सुनावणी होईपर्यंत दोघींनाही अटक होणार नसल्याचे आता याप्रकरणी पुढील सुनावणी 26 फेब्रुवारीला होणार आहे.
या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या नर्सच्या मते हे त्यांचे कर्तव्य बजावत होते. या इमारतीमध्ये फायर आलाराम आणि फायर एकनिष्ठ या दोन गोष्टी नसल्याने ही एवढी मोठी घटना घडली. त्यामुळे ही आमची चूक नसून शासकीय यंत्रणेतील तांत्रिक चूक आहे. तरीही आम्हाला निष्कारण या प्रकरणात गुंतवला जात आहे.
तसेच या नर्स वर होत असलेले आरोप चुकीचे आहेत या कंत्राटी कामगारांना गुंतवून इतरांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप गुन्हा दाखल झालेल्या नर्सच्या वकिलांनी केलेला आहे.
हेही वाचा-पोहरादेवी गर्दी प्रकरण : प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे