भंडारा -परतीच्या पावसाचा जिल्ह्यातील धान पिकाला मोठा फटका बसला आहे. प्रशासनाकडून कृषी विभाग आणि महसूल विभागाने केलेल्या संयुक्त सर्वेक्षणाचा 8806 हेक्टर शेतीचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. जिल्ह्यातील 20,116 शेतकऱ्यांच्या धान पिकाचे नुकसान झाले आहे. सरकारने या नुकसानीसाठी आठ हजार रुपये प्रती हेक्टर, अशी मदत घोषित केली आहे.
भंडारा येथे परतीच्या पावसामुळे नऊ हजार हेक्टर शेतजमिनीचे नुकसान... हेही वाचा... आजपासून इफ्फीची सुरूवात, अमिताभ बच्चनसह रजनीकांत राहणार उपस्थित
भंडारा जिल्ह्यात 1 लाख 80 हजार हेक्टर क्षेत्रावर खरिप हंगामात धान पिकाची लागवड करण्यात आली होती. सुरुवातीला पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीची वेळ आली. मात्र नंतर पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना वाचविले, मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना जाता जाता पुन्हा रडवले आहे.
हेही वाचा... भाजप-शिवसेनेची महायुती तुटल्यानंतर अमित शाह प्रथमच येणार महाराष्ट्रात
ऑक्टोबर महिन्याच्या शेवट झालेल्या पावसात कापणीला आलेले धान पीक आणि कापून ठेवलेले शेतातील धान खराब झाले. यानंतर पालकमंत्री आणि खासदार यांनी पिकाची पाहणी केली. यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात धान पिकाचे नुकसान झाल्याचे सांगितले होते. यानंतर अनेक वेळा सर्वेक्षण झाले. मात्र, सरतेशेवटी कृषी विभाग आणि महसूल विभागाने केलेल्या संयुक्त संरक्षणात केवळ 8806 हेक्टर शेतीचा नुकसान झाल्याचे घोषित करण्यात आले. त्यातही कोरडवाहू 2609 हेक्टर आणि बागायती 6097 हेक्टर नुकसान झाल्याचे अहवालात नमूद केले.
हेही वाचा... #HBDMilkhaSingh : ...बापाचं छत्र हरवलेल्या पोराचा 'फ्लाईंग सिख' झाला बाप
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार रुपये मदतीची घोषणा सरकारने केली आहे. ही मदत तशी तुटपुंजी आहे, मात्र तरीही राजकीय अस्थिरतेमुळे मिळणारी मदत कधी आणि केव्हा मिळेल याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.