महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

NIA raids espionage case : हेरगिरी प्रकरणी एनआयएची बुलढाणा शहरात छापेमारी - आंध्रप्रदेशात दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात

राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयए ने गुरुवारी रात्री बुलढाणा शहरात छापेमारी (NIA raids espionage case) केल्याची माहिती आहे. एनआयएने एकाचवेळी बुलढाणा आणि गुजरात येथेही तपास (Investigations in Buldhana and Gujarat) केला आहे. हेरगिरीच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानी हेरांनी बुलढाणा येथील सिम वापरल्याचे तपासात समोर आले त्यावरुन ही छापेमारी होत असल्याचे सांगितले जात आहे.

By

Published : Mar 25, 2022, 11:23 AM IST

बुलढाणा: हेरगिरीच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने बुलढाणा व गुजरातमधील गोधरा येथे छापे मारल्याची माहिती आहे. रात्री उशिरा हे छापे मारण्यात आले आहेत. जानेवारी 2020 मध्ये आंध्रप्रदेशात दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात (Regarding the crime filed in Andhra Pradesh) हे छापे असल्याचे एनआयए ने म्हटले आहे. दहशतवादी हल्ले करण्यासाठी संवेदनशील माहिती गोळा केल्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. पाकिस्तानी हेरांचा या कृत्यात सहभाग असल्याचा संशय आहे. गुजरात मधील गोधरा व बुलढाणा येथे एकाच वेळी छापे मारण्यात आले यात काही संशयास्पद सिम कार्ड , कागदपत्रे व काही इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले आहे. अशी कारवाई झाल्याचा दुजोरा जिल्ह्याचे प्रभारी पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यांनी दिला आहे

ABOUT THE AUTHOR

...view details