महामारीचे संकट: भंडाऱ्यात एकाच दिवशी आढळले नवे 13 कोरोना रुग्ण - Latest Bhandara news
जिल्ह्यातील 3 हजार 309 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 71 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर 3135 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
भंडारा – जिल्ह्यात एकाच दिवशी म्हणजे आज 13 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यापूर्वी एकाच दिवशी एवढे कोरोनाबाधित रुग्ण जिल्ह्यात आढळले नव्हते. रुग्णाच्या संख्येत होणाऱ्या वाढीमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पवनी तालुक्यतील 7, भंडारा तालुक्यतील 3, तुमसर तालुक्यातील 2 व लाखनी येथील 1 रुग्ण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 41 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात 30 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाबाधितांची जिल्ह्यातील एकूण संख्या 71 एवढी झाली आहे. गुरुवारपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 58 होती.
- शुक्रवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या 13 कोरोनाबाधित रुग्णांपैकी पवनी तालुक्यातील सात रुग्ण आहेत. यामध्ये पवनी, पिलांद्री, चिखली, कोंडा, कोसरा येथील प्रत्येकी 1 तर पिंपळगाव येथील 2 रुग्ण आहेत. तर भंडारा तालुक्यातील दिल्लीहून आलेले तीन लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत. तुमसर तालुक्यातील दोन लोक आणि लाखणी तालुक्यातील एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळला आहे.
- पॉझिटिव्ह आढळलेल्या तेरा व्यक्तीपैकी चार व्यक्ती नागपूरवरून, दिल्लीतील तीन व्यक्ती, मुंबईतून दोन व्यक्ती, छत्तीसगड, पुणे व कतार या ठिकाणाहून प्रत्येकी एक व्यक्ती जिल्ह्यात दाखल झाले होते.
- जिल्ह्यातील 3 हजार 309 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 71 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर 3135 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 103 कोरोना रुग्णांचे अहवाल प्राप्त अजून आलेले नाहीत.
- विलगीकरण कक्षामध्ये आज (19 जून) 24 व्यक्ती दाखल झालेल्या आहेत. तर 414 व्यक्तींना विलगीकरण कक्षामधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोविड केअर सेंटर साकोली, तुमसर व मोहाडी येथे 530 भरती आहेत. 2 हजरा 333 व्यक्तींना रुग्णालय विलगीकरणामधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
- पुणे, मुंबई व इतर राज्यांतून 42 हजार 942 व्यक्ती जिल्ह्यात आले आहेत. त्यापैकी 37 हजार 377 व्यक्तींचा 28 दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या 5 हजार 565 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांनी घराबाहेर पडू नये, अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.