महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

इतिहासात पहिल्यांदाच बजेट अधिवेशन विदर्भात होईल - नाना पटोले - बजेट अधिवेशन २०२०-२१

कोरोनामुळे नागपुरात हिवाळी अधिवेशन होणार नाही. त्याऐवजी प्रथमच बजेट अधिवेशन नागपुरात होणार आहे. ही बाब विदर्भासाठी आनंदाची असल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

nana patole said first time in history, State budget convention will be held in Vidarbha
इतिहासात पहिल्यांदाच बजेट अधिवेशन विदर्भात होईल - नाना पटोले

By

Published : Nov 12, 2020, 6:03 PM IST

भंडारा - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हिवाळी अधिवेशन नागपुरात होत नसले तरी बजेट अधिवेशन नागपुरात होईल. त्यामुळे विदर्भाच्या लोकांवर अन्याय झाला नसून बजेट अधिवेशनामुळे विदर्भाला अधिक न्याय मिळेल. इतिहासात पहिल्यांदाच बजेट अधिवेशन नागपुरात होणार आहे. ही बाब विदर्भासाठी आनंदाची असल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

नाना पटोले बोलताना....
दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा हिवाळी अधिवेशन नागपूर येथे घेण्याचे ठरले होते. डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशन होणार होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने या अधिवेशनाला सुरळीत ठेवण्यासाठी बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या. विशेषत: आमदार निवास आणि रवी भवन येथे कोरोनासाठी सुरू असलेल्या चाचण्या किंवा कोरोनायोद्धे असलेले डॉक्टर, नर्सेस यांच्यासाठी राहण्याची असलेली व्यवस्था या अधिवेशनामुळे बंद करावी लागली असती. या सर्व अडचणीमुळे विदर्भात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे बऱ्याच आमदारांनी हिवाळी अधिवेशन नागपुरात घेऊ नये, अशी विनंती केली होती. या विनंतीचा विचार करीत हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत घेण्याचे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी ठरविले.
काय म्हणाले नाना पटोले...

वर्षातून एक तरी अधिवेशन नागपूरला व्हावे असे ठरले आहे. त्यामुळे हिवाळी अधिवेशन रद्द झाले असले तरी बजेट अधिवेशन नागपुरला घ्यावे, अशी मागणी विदर्भातील नेते मंडळींनी केली होती. त्याला सत्ता आणि विरोधी पक्षातील लोकांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच विदर्भामध्ये बजेट अधिवेशन होणार आहे. अधिवेशनामुळे विदर्भाला जास्त न्याय मिळू शकतो. त्यामुळे हिवाळी अधिवेशन विदर्भात झाले नाही. त्यामुळे विदर्भावर अन्याय झाला असे म्हणणे चुकीचे ठरेल, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details