महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतातील  मिटर रूममध्ये सापडलेल्या नागिनीसह 20 पिल्लांना जीवदान - भंडाऱ्यात नागिनीसह तिच्या 20 पिल्लांना जीवदान

पवनी तालुक्यातील आसगाव गावात शेतामध्ये नागिनीसह 20 पिल्ले आढळून आली. मैत्र ग्रुपचे सदस्य असलेल्या सर्पमित्रांनी त्यांना पकडून सुखरूप जंगलात सोडले. तसेच, इतर ठिकाणी पकडेला एक नाग आणि पानदिवड जातीचा सापही नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आला.

bhandra
bhandra

By

Published : Jun 23, 2021, 8:59 PM IST

Updated : Sep 16, 2022, 6:55 PM IST

भंडारा -पवनी तालुक्यातील आसगाव गावात शेतामध्ये नागिनीसह 20 पिल्ले आढळून आली. सेंद्री रोडवर असलेल्या शेतातील मीटर घरामध्ये उंदराच्या बिळात नागिन आणि तिची पिल्ले आढळली. मैत्र ग्रुपचे सदस्य असलेल्या सर्पमित्रांनी त्यांना पकडून सुखरूप जंगलात सोडले.

सुरवातीला दिसला एकच सापपण नंतर पवनी तालुक्यातील आसगाव-सेंद्री रोडवरील किशोर काटेखाये यांच्या शेतात काम करणाऱ्या मजुराला शेतातील मीटर घरामध्ये साप असल्याचे दिसले. त्यांनी लगेच शेत मालकास फोन करून माहिती दिली. काटेखाये यांनी क्षणाचाही विलंब न करता सर्पमित्र नामदेव मेश्राम यांना फोन करून माहिती दिली. माहिती मिळताच शुभम ब्राम्हणकर या सहकाऱ्याला सोबत घेऊन नामदेव मेश्राम काटेखाये यांच्या शेतात हजर राहिले. त्यांनी मीटर घरात साप पकडण्याच्या प्रयत्न केला. यावेळी त्यांना एका मागून एक सापाची पिल्ले दिसली. सर्व पिल्ले बाहेर काढली. तेव्हा एक नव्हे, दोन नव्हे तर चक्क नागिनीसह 20 पिल्ले आढळून आली. सोबतच एक धामण जातीचा सापसुद्धा आढळला. या सर्व सापांना मोठ्या शिताफीने पकडले. नागिणीला वेगळ्या डब्यात, तर सर्व पिल्लांना वेगळ्या डब्यात सुखरूप ठेवण्यात आले.

धामण सोडले पुन्हा शेतातचया सर्व सापांना सुखरूप पकडले. त्यात धामण हे बिनविषारी असल्याने शेतातील उंदीर, घुस व अन्य पिकाची नासाडी करणाऱ्या उपद्रवी किटकांना भक्ष करते. त्यामुळे साप हा शेतकऱ्यांचा मित्र असल्याचे शेतमालकाला पटवून दिले. यानंतर धामणाला शेतातच सोडण्याची सहमती शेतकऱ्याने दिली. त्यानुसास, धामणाला शेतातच सोडण्यात आले.

नागिनीसह 20 पिल्लेजंगलातसोडलेनागिनीसह 20 पिल्लांना उमरेड पवनी कऱ्हाड अभयारण्यातील पवनी गेटकडून लांब जंगलात सुखरूप सोडण्यात आले. या सोबतच खराबे राईस मिल आसगाव येथे पकडलेला एक नाग, तुकडूदास वैद्य मांगली यांच्या घरी पकडलेला एक तस्कर जातीचा साप, ज्ञानेश्वर रासेकर भिवापूर यांनी पकडलेला पानदिवड जातीचा साप या सर्वांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

मैत्र ग्रुपचे कौतुकपवनी तालुक्यात वन्य जीवांचे अहोरात्र रक्षण करण्याचे कार्य येथील मैत्र वन्यजीव संरक्षण व संवर्धन बहुउद्देशीय संस्था अनेक वर्षांपासून करत आहेत. नागिनीसह 20 पिल्लांना पकडून सुखरूप त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडल्यामुळे मैत्र टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही कामगिरी मैत्रचे नामदेव मेश्राम, चंदू देशमुख, शुभम ब्राम्हणकर, माधव वैद्य, गजानन जुमळे, उमेश दलाल यांनी पार पाडली.

Last Updated : Sep 16, 2022, 6:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details