महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आईला शिवीगाळ केली म्हणून शेजाऱ्याची गळा चिरून केली हत्या

आरोपी आकाश व मृतक गंगाधर हे एकमेकांचे शेजारी होते. दोघांचे कुटुंबाचे चांगले संबंध असल्याने एकमेकांच्या घरी येणे जाणे सुरू होते. घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास गंगाधर दारू पिऊन आरोपी आकाशच्या घरी गेला होता. यावेळी काही कारणावरून आकाशच्या आईसोबत त्याचे भांडण झाले.

Murder by slitting the throat of a neighbor as he abused his mother
आईला शिवीगाळ केली म्हणून शेजाऱ्याची गळा चिरून केली हत्या

By

Published : Oct 29, 2021, 7:11 PM IST

भंडारा -शेजारी राहणाऱ्या 49 वर्षीय इसमाची 21 वर्षीय तरुणाने गळा चिरून हत्या केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोडाडी तालुक्यात घडली आहे. गंगाधर उर्फ बंग्या नत्थू निमजे असे मृतकाचे नाव असून त्याने आरोपी आकाश विजय श्रीपाद (रा. गांधी वार्ड) याच्या आईला शिवी दिल्याने आकाशने मृतकाची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्येनंतर आरोपी आकाश ने मोहाडी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आत्मसमर्पण केले आहे.

आईसोबत झाले होतो भांडण -

आरोपी आकाश व मृतक गंगाधर हे एकमेकांचे शेजारी होते. दोघांचे कुटुंबाचे चांगले संबंध असल्याने एकमेकांच्या घरी येणे जाणे सुरू होते. घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास गंगाधर दारू पिऊन आरोपी आकाशच्या घरी गेला होता. यावेळी काही कारणावरून आकाशच्या आईसोबत त्याचे भांडण झाले.

आईला शिवी दिल्याने आकाश संतापला आणि केली हत्या -

मृतक गंगाधर आणि आरोपीच्या आईचे भांडण सुरू झाल्यावर दारूच्या नशेत असलेल्या गंगाधर याने आकाशच्या आईला शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांच्या घरच्या समोर ठेवलेली मारोती ओमनी वाहनाची तोडफोड सुरू केली. हा प्रकार आकाशला माहित होताच त्याचा राग अनावर झाला. रागाच्या भरात त्याने सायकलचा काटेरी गियर गंगाधर निमजे याच्या गळ्यावर मारला. यात गंभीर जखमी झालेल्या गंगाधर याचा अतिरक्तस्त्रावाने जागीच मृत्यू झाला.

आरोपीने केले आत्मसमर्पण -

घटनेची माहिती होताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. मृतकाची शरीरयष्टी दणकट होती, तर आरोपी हा सळपातड असल्याने त्याने हत्या केलीच कशी असा प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थीत होत होता. मात्र आईला शिव्या दिल्याने आरोपी संतप्त झाला आणि जेव्हा सर्व सामान्य व्यक्तीच्या सहनशक्ती पलीकडे गोष्ट गेली की तो परिणामाची चिंता करीत नाही. आणि कधीही कोणतेही चुकीचे कार्य ना करणाऱ्या आकाशने हत्या केली आणि आरोपी झाला. हत्येनंतर आरोपी आकाशने स्वतःच पोलीस ठाणे गाठून गुन्ह्याची कबुली देत आत्मसमर्पण केले. पोलिसांनी लगेच त्याला अटक केली व घटनास्थळ गाठून पंचनामा केला. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक राहूल देशपांडे याच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, लक्ष्मण जाधव करीत आहेत.

हेही वाचा -बिडिओवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या रोहोयो अधिकाऱ्याचा मृत्यू; ऑडिओ क्लिपद्वारे धक्कादायक माहिती समोर

ABOUT THE AUTHOR

...view details