भात लावणीसाठी आणखी पावसाची आवश्यकता, या वर्षी उत्पादनात घट होण्याची शक्यता - rain in bhandara
भंडारा जिल्ह्यात केवळ दहा टक्के रोवण्या झाल्या आहेत. पऱ्यांची (भाताची रोपे) लागवडीची कालमर्यादाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे या वर्षी उत्पादनात घट होण्याची शक्यता कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
भात लावणीसाठी आणखी पावसाची आवश्यकता
भंडारा - मागील २५ दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारपासून जिल्ह्यात पुनरागमन केले. मात्र रोवणीयोग्य पाऊस अजूनही बरसलेला नाही. पुढच्या तीन-चार दिवस पाऊस सुरू राहिला तरच रोवणीला सुरुवात होईल. आतापर्यंत जिल्ह्यात केवळ दहा टक्के रोवण्या झाल्या आहेत. तसेच पऱ्यांच्या (भाताची रोपे) लागवडीची कालमर्यादाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे या वर्षी उत्पादनात घट होण्याची शक्यता कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.