प्रदीर्घ कालावधीनंतर जिल्ह्यात पावसाची सर्वदूर हजेरी - reactivation of monsoon
प्रदीर्घ कालावधीनंतर भंडारा जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना नवीन जीवनदान मिळाले आहे. नागरिकांनाही असह्य उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
प्रदीर्घ कालावधीनंतर भंडारा जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली
भंडारा - 20 ते 25 दिवसांच्या कालावधीनंतर भंडारा जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना नवीन जीवनदान मिळेल. नागरिकांनाही असह्य उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र हा पाऊस दररोज यावा, अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.