महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विनयभंग प्रकरण : आमदार चरण वाघमारेंना 10 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

शनिवारी सकाळी चरण वाघमारे यांना चौकशीसाठी बोलवून पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यामुळे पोलिसांच्या या चुकीच्या पद्धतीचा निषेध करत आमदार चरण वाघमारेंनी जामीन घेण्यास नकार दिला.

आमदार चरण वाघमारे

By

Published : Sep 28, 2019, 8:29 PM IST

Updated : Sep 28, 2019, 8:55 PM IST

भंडारा- महिला पोलीस उपनिरीक्षक यांच्या विनयभंगप्रकरणी अटक केलेल्या आमदार चरण वाघमारेंना 10 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. अटक केल्यानंतर तुमसरच्या न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने त्यांना 10 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

आमदार चरण वाघमारे

शनिवारी सकाळी चरण वाघमारे यांना चौकशीसाठी बोलवून पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यामुळे पोलिसांच्या या चुकीच्या पद्धतीचा निषेध करत आमदार चरण वाघमारेंनी जामीन घेण्यास नकार दिला. तर उमेदवारी अर्ज भरण्याची 4 ऑक्टोबर ही शेवटची तारीख असल्यामुळे आमदार वाघमारे हे उमेदवारी अर्ज भरण्याचे कारण देत जामीन अर्ज करतात की, तुरूंगातूनच उमेदवारी अर्ज भरतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर विनयभंग प्रकारानंतर वाघमारेंना भाजपकडून तिकीट मिळते का नाही? याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

हेही वाचा - भाजप आमदाराला विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक; महिला पोलिसाशी केले होते गैरवर्तन

तर माझ्या विरुद्धचे हे षडयंत्र आहे. याविरुद्ध मी शेवटपर्यंत लढा देईन, तर हे षड्यंत्र ज्यांनी रचले त्यांना मी त्यांची जागा दाखवून देईन, असे आमदार वाघमारे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.

हेही वाचा - ईव्हीएम सुरू ठेवण्यासाठी काँग्रेस-भाजपची पडद्यामागे युती; वामन मेश्रामांचा घणाघात

Last Updated : Sep 28, 2019, 8:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details