महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पोलीस असल्याचे सांगून अल्पवयीन मुलीचा अपहरणाचा प्रयत्न; प्रतिकार केल्याने मुलगी सुखरूप

पीडित मुलगी लाखनी येथे एका महाविद्यालयात शिकते. 9 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता महाविद्यालयातून राष्ट्रीय महामार्ग 6 गडेगाव येथे ती रस्त्यावर उभी होती. दरम्यान, एका चारचाकी गाडीतून आलेल्या व्यक्तीने तीला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तुला भंडाऱ्यात सोडतो असे सांगितले.

minor-girl-attempt-to-kidnapping-in-bhandara
minor-girl-attempt-to-kidnapping-in-bhandara

By

Published : Feb 10, 2020, 11:48 PM IST

भडारा-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील गडेगाव येथे पोलीस असल्याचे सांगत एका नराधमाने अल्पवयीन तरुणीचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला आहे. तरुणीने केलेल्या प्रतिकारामुळे तिला गाडीखाली फेकत आरोपीने पळ काढला. लाखनी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलीस सांगून अल्पवयीन मुलीचा अपहरणाचा प्रयत्न

हेही वाचा-राष्ट्रवादीच्या 'त्या' नेत्याच्या हत्येसाठी दिली होती ४० लाखांची सुपारी, चौघे ताब्यात


पीडित मुलगी लाखनी येथे एका महाविद्यालयात शिकते. 9 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता महाविद्यालयातून राष्ट्रीय महामार्ग 6 गडेगाव येथे ती रस्त्यावर उभी होती. दरम्यान, एका चारचाकी गाडीतून आलेल्या व्यक्तीने तिला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तुला भंडाऱ्यात सोडतो असे सांगितले. दरम्यान त्याने मुलीची गाडीत छेडछाड सुरू केली. मुलीने प्रतिकार केला. यात त्या व्यक्तीने मुलीला गाडीतून फेकून पळ काढला.

याप्रकरणी लाखनी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस अधिक्षकांनी यासाठी 6 पथके आरोपीच्या शोधत पाठविली आहेत. विभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details