महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महादेव जानकर यांच्या हस्ते भंडारा पोलीस मैदानावर 'ध्वजारोहण' - ध्वजारोहण

यावेळी क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या खेळाडूंना सेच बचत गट व औद्योगिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या संस्थांचे लोकांना मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह, शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

ध्वजारोहण

By

Published : Aug 16, 2019, 9:25 AM IST

भंडारा - पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते पोलीस मैदानावर स्वातंत्र्यदिनाचा मुख्य ध्वजारोहण समारंभ पार पडला. राज्य शासनाने मागील पाच वर्षात केलेल्या कामाचा आढावा मंत्री महादेव जानकर यांनी यावेळी दिला. जनसामान्यांच्या कल्याणासाठी शासन सदैव कटिबद्ध आहे, असे जानकरांनी आपल्या भाषणात सांगितले. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर परेडचे निरीक्षण करून त्यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच पोलीस दलातर्फे संयुक्त संचालन व गृहरक्षक दलातर्फे संयुक्त मानवंदना देण्यात आली.

महादेव जानकर यांच्या हस्ते भंडारा पोलीस मैदानावर 'ध्वजारोहण'

भंडारा जिल्हा दूध उत्पादनामध्ये विदर्भात प्रथम क्रमांकावर असून जिल्ह्यात प्रतिदिन सरासरी 4 लाख 50 हजार लिटर दूध उत्पादन होत आहे. देशी गाई, म्हशी, संकरित गाईपासून दूध उत्पादन वाढवण्याकरता पशुसंवर्धन विभागामार्फत कृत्रिम रेतन कार्य मोठ्या प्रमाणात हाती घेतले आहे, कृत्रिम रेतन कार्यात आज भंडारा जिल्हा महाराष्ट्र राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

ग्रामीण भागात शंभर टक्के विद्युतीकरणाची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासनाने दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना सुरू केली असून भंडारा जिल्ह्यासाठी 25.06 कोटीची आर्थिक तरतूद मंजूर केली आहे. भंडारा जिल्ह्यांमध्ये मागील चार वर्षांत आठ हजार 364 कृषी पंपांना वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री हर घर बिजली सौभाग्य योजनेतील जिल्ह्यातील 4261 लाभार्थ्यांना नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे. लवकरच अन्य लाभार्थ्यांनाही याचा फायदा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सर्वांसाठी घरे प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेअंतर्गत 35 हजार 887 घरकुलांना मंजुरी देण्यात आली असून सुमारे 22 हजार 234 घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. गरिबांचे घरांचे स्वप्न पूर्ण करणारी शासनाची योजना असून या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गरजूंना घरकुल मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे ते यावेळी म्हणाले.

जिल्हा खनिज प्रतिष्ठान वार्षिक कृती आराखडा सण 2018 -19 अंतर्गत भंडारा जिल्ह्यासाठी एकूण 19 कोटी 68 लाख 77 हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या निधीमधून जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे.

प्रधानमंत्री उज्वला योजनेतून भंडारा जिल्ह्यात 81 हजार 130 गॅस कनेक्शन वितरित करण्यात आले आहेत. भंडारा जिल्ह्यासाठी 1000 सिंचन विहिरी बांधण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी 983 सिंचन विहिरीचे काम पूर्ण झाली आहे. उर्वरित सिंचन विहिरी लवकर पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा असल्याने जिल्ह्यात बांध प्रजनन मत्स्यजिरे निर्मिती हा महत्त्वाचा व्यवसाय असून मत्स्य बीज केंद्र शिवनीबांध या शासकीय मत्स्यबीज केंद्रावर दोन कोटी 87 लाख मत्स्यबीज निर्मिती झाली आहे. एकंदरीत बांध प्रजननसह जिल्ह्यात एकूण दहा कोटी 80 लाख मत्स्यजिरे निर्मिती झाली आहे. शेतीत पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसायासह मत्स्य व्यवसायाची निवड करावी, असे आव्हान त्यांनी यावेळी केले आहे.

कोल्हापूर, सांगली या पूरग्रस्त जिल्ह्यातील नागरिकांना मदतीसाठी भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनी पुढे येऊन आवश्यक ती सढळ हस्ते रोख, डीडी किंवा वस्तू स्वरुपात मदत करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या खेळाडूंना सेच बचत गट व औद्योगिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या संस्थांचे लोकांना मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह, शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details