भंडारा -सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोसेखुर्द धरणाचे काम सुरू आहे. येत्या तीन ते साडेतीन वर्षांमध्ये गोसेखुर्द प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वर्तवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद सभेसाठी ते भंडारा येथे आले होते. त्यावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्न उत्तर देताना ते म्हणाले, गोसे प्रकल्पातील सर्वाधिक प्रश्न म्हणजे धरणग्रस्त लोकांचे पुनर्वसन आणि भूसंपादन आहे. त्यामुळे हा प्रश्न शक्य तेवढ्या लवकर मार्गी लावण्यासाठी नियोजन केले असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.