महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष : तपासणी न करताच भंडाऱ्यात दिले जाते वैद्यकीय प्रमाणपत्र - ई पास भंडारा न्यूज

प्रमाणपत्र घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना सुरुवातीला फॉर्म घेण्यासाठी भटकंती करावी लागते. फॉर्म भरुन झाल्यानंतर नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी रांगेत उभे राहावे लागते. एवढे सर्व केल्यानंतर वैद्यकीय तपासणी न करताच हे प्रमाणपत्र देण्यात येत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.

medical-certificate-get-without-checking-at-bhandara
तपासणी न करताच भंडाऱ्यात मिळते वैद्यकीय प्रमाणपत्र...

By

Published : Jul 23, 2020, 4:14 PM IST

भंडारा -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आला आहे. या ई-पाससाठी वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे. मात्र, भंडाऱ्यात हे प्रमाणपत्र तपासणी न करताच दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, या बोगस प्रमाणपत्रासाठी नागरिकांना जीव धोक्यात घालून गर्दीच्या ठिकाणी रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे या बोगस प्रमाणपत्रासाठी नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा धंदा बंद करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

तपासणी न करताच भंडाऱ्यात मिळते वैद्यकीय प्रमाणपत्र...
कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी शासनाने जिल्हाबंदी लागू केलेली आहे. जिल्ह्यात येण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी ई-पास सक्तीचा केला आहे. ई-पाससाठी वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे. भंडारा शहरात वैद्यकीय प्रमाणपत्र नगरपालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दिले जाते. यासाठी इथे डॉक्टर आणि नर्स सेवा देत आहेत.प्रमाणपत्र घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना सुरुवातीला फॉर्म घेण्यासाठी भटकंती करावी लागते. फॉर्म भरुन झाल्यानंतर नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी रांगेत उभे राहावे लागते. सर्व केल्यानंतर वैद्यकीय तपासणी न करताच हे प्रमाणपत्र देण्यात येत असल्याचा प्रकार उघड झाला आहे.


याविषयी डॉक्टरांना विचारले असता त्यांनीही कबुली दिली आहे, की इथे येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची वैद्यकीय तपासणी न करता आम्ही त्यांना प्रमाणपत्र देतो. कारण, वैद्यकीय तपासणी करण्यासाठी लागणारे यंत्र आमच्याकडे उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

याविषयी भंडारा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी जाधव यांना विचारले असता याविषयी तपासणी करू आणि सत्यता आढळल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करू, असे त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details