भंडारा - शिस्तभंगाच्या कारवाईचा भंडारा जिल्ह्याच्या कर्मचाऱ्यांनी धसका घेतला असून भंडारा जिल्ह्यातील अनेक कर्मचारी, गुरुवारी झालेल्या कामगार कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपापासून दूर राहिल्याचे चित्र समोर आले. मोजक्याच कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केले आहे. मात्र, कामावर उपस्थित कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयात उपस्थित राहून काळ्या फिती लावत आपला निषेध व्यक्त केला. कोरोनाचा प्रादुर्भावामुळे कामगारांना एकत्रित न येता आंदोलन करण्याचे सांगितले असल्याने एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात कर्मचारी दिसत नसले, तरी या आंदोलनात संपूर्ण कर्मचारी सहभागी असल्याचे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.
27 संघटना या आंदोलनात एकत्रित -
शिस्तभंगाच्या कारवाईचा कर्मचाऱ्यांनी घेतला धसका; अनेक कामगार संपापासून दूर
गुरुवारी झालेल्या कामगार कर्मचाऱ्यांच्या देशव्यापी संपापासून दूर राहिल्याचे चित्र समोर आले. मोजक्याच कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केले आहे. मात्र, कामावर उपस्थित कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयात उपस्थित राहून काळ्या फिती लावत आपला निषेध व्यक्त केला.
अखिल भारतीय राज्य कर्मचारी महासंघ तसेच राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांच्या नेतृत्वात सत्तावीस संघटनांनी भंडारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी कामबंद आंदोलन पुकारले होते. 2005 पासून जे कर्मचारी कामावर रुजू झालेले आहेत, त्यांना दिली जाणारी अंशदायी पेन्शन योजना ही बंद करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शासकीय यंत्रणेचे सुरू असलेले खाजगीकरण थांबवावे यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी कामगारांनी हे कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले होते.
कर्मचाऱ्यांचे संमिश्र प्रतिसाद -
कामगारविरोधी कायदा, शेतकरीविरोधी कायदा, शिक्षणविरोधी कायदा, तसेच रेल्वे, बँक, एलआयसी, सरंक्षण, पेट्रोलियम आदी सार्वजनिक क्षेत्रातील खाजगीकरणच्या विरोधात आज देशव्यापी कर्मचारीसंपाची आज हाक देण्यात आली होती. मात्र, संपात सहभागी झाल्यास शिस्त भंगाच्या कारवाईची नोटीस दिल्याने भंडारा जिल्ह्यातील अनेक कर्मचारी या संपतात सहभागी झाले नाही. मोजक्याच कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केले. त्यामुळे कर्मचारी संपाला समिश्र प्रतिसाद दिसला.
संपात सहभागी झाल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, अशी नोटीस बजावल्या त्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग न घेता थेट कार्यालय गाठले आणि या कार्यालयात जाऊन दैनंदिन कामकाज पार पाडले. मात्र, हे करत असताना काळा फिती बांधून शासनाच्या धोरणाचा त्यांनी निषेध नोंदविला. कारवाईचे धाक दाखवून या कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावले गेले. एवढे मात्र खरे. शासनाला आजचे आंदोलन म्हणजे चेतावणी आहे. शासनाने या कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर भविष्यात यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल, असे संघटनेतर्फे सांगण्यात आले.