महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यू-मलेरियाचा प्रभाव जास्त; मात्र परिस्थिती नियंत्रणात - भंडारा आरोग्य विभाग

राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, या बरोबरच प्रतिवर्षी भेडसावणारी डेंग्यू मलेरियाच्या समस्येकडेही भंडारा आरोग्य विभागाचे लक्ष आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मलेरिया डेंग्यू या आजाराचे प्रमाण यावर्षी वाढल्याचे आरोग्य विभागाकडील रुग्ण नोंदीवरून दिसून येत आहे. मात्र, आरोग्य विभागाकडून सर्व उपाययोजनांचा वापर करण्यात येत असल्याने परिस्थिती नियंत्रणात असल्याचीही माहिती हिवताप विभागाकडून देण्यात आली.

Malaria and dengue news
यंदा डेंग्यू-मलेरियाचा प्रभाव जास्त

By

Published : Sep 24, 2020, 1:10 PM IST

Updated : Sep 24, 2020, 1:21 PM IST

भंडारा- मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मलेरिया आणि डेंग्यूच्या संख्येत किंचित वाढ झाली असली तरी मात्र परिस्थिती नियंत्रणात आहे. कोरोना महामारीच्या काळात नागरिकांकडून स्वच्छतेची आणि आरोग्याची काळजी घेतली जात आहे. त्यामुळे डासांच्या निर्मितीची संख्या कमी आहे. मात्र जिल्ह्यातील दमट वातावरण हे डास निर्मितीसाठी पोषक आहे. त्यामुळे आमचे या परिस्थितीवर लक्ष असून आवश्यक असल्यास उपाय योजना केली जाईल, असे जिल्हा हिवताप विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

यंदा डेंग्यू-मलेरियाचा प्रभाव जास्त
भंडारा जिल्ह्यात सध्या कोरोनाची रुग्णांची संख्या दररोज उच्चांक गाठत आहे. अशात जर डेंग्यू आणि मलेरिया याचा प्रादुर्भाव झाला असता तर परिस्थिती अतिशय वाईट राहिली असती. कारण भंडारा जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया, चंडीपूरा या आजारांनी काही वर्षं डोके वर केले होते, यामध्ये बऱ्याच लोकांचा जीव गेला होता. मात्र मागील पाच वर्षापासून ही स्थिती काही प्रमाणात का होईना नियंत्रणात आलेली आहे. दरवर्षी या आजाराचे रुग्ण आढळतात मात्र त्यांचे प्रमाण कमी झाल्याचे स्पष्ट आहे.मागच्या वर्षी जानेवारी 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत मलेरियाचे एकूण सात रुग्ण आढळले होते. तर डेंग्यूचे सुद्धा सातच रुग्ण यादरम्यान आढळते होते. तर जानेवारी ते ऑगस्ट 2020 या कालावधीत मलेरियाचे एकूण 13 रुग्ण आढळले आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत सहा रुग्ण जास्त आढळलेले आहेत. यावर्षी जुलै महिन्यामध्ये मलेरियाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली होती. या महिन्यात नऊ रुग्ण आढळले होते. मात्र ज्या परिसरात रुग्ण आढळले त्या परिसरामध्ये औषधी फवारणी करून यावर नियंत्रण मिळविण्यात आले. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात केवळ दोन रुग्ण आढळून आले, तर जानेवारी 2020 ते ऑगस्ट 2020 या कालावधीत डेंग्यूचे एकूण आठ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आणि मागच्या वर्षीच्या तुलनेत एक रुग्ण यावर्षी डेंग्यूचा जास्त आढळला आहे. सध्या जिल्ह्यामध्ये डेंग्यू किंवा मलेरियाचे रुग्ण नाहीत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
विनोद जाधव ,मुख्यधिकारी भंडारा
कोरोनाच्या या कार्यकाळात हिवताप विभागात काम करणारे कर्मचारी आणि नगर पालिकेत काम करणारे अधिकारी हे नेहमीच्या काम व्यतिरिक्त कोरोनाच्या नियंत्रणासाठी लागले होते. मात्र जुलै महिन्यात मलेरियाच्या संख्येत अचानक वाढ झाल्याने ही हिवताप नियंत्रण यंत्रणा पुन्हा त्यांच्या मूळ कामात म्हणजे मलेरिया आणि डेंग्यू सारख्या या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. मात्र नगर पालिकेचे आरोग्य विभागातील बहुतेक कर्मचारी हे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या लोकांचा अंत्यविधी पासून ते वेगवेळ्या ठिकाणी सॅनिटायझिंग करण्याच्या या कामात व्यस्त आहेत. त्यामुळे शहरात नेहमी प्रमाणे औषध फवारणी आणि नाले सफाईचे काम करणे शक्य होत नसले तरी काही कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शक्य तेवढी फवारणी केली जात आहे. तसेच मलेरिया आणि डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी अजूनही योजना आखून ठेवल्या असल्याचे भंडारा नगर पालिका मुख्याधिकारी यांनी सांगितले.सध्या कोरोनाच्या काळात नागरिक स्वतःच्या घरी जास्तीत जास्त राहण्याने पसंत करत आहेत. त्यातच स्वतःला आणि परिसराला स्वच्छ ठेवण्यासाठी काळजी घेत आहेत. त्यामुळे डेंग्यू किंवा मलेरियाच्या डासांच्या उत्पत्तीचे प्रमाणही कमी आहे. मात्र भंडारा जिल्ह्यातील सध्याच्या दमट वातावरणामुळे डासांची काही प्रमाणात उत्पत्ती होत आहे. मात्र डेंग्यू किंवा मलेरियाच्या डासांची उत्पत्ती होऊ नये याची काळजी हिवताप विभागातर्फे घेतली जात आहे. त्यासाठी औषध फवारणी आणि फॉगिंग करण्याचे काम विभागातर्फे सतत सुरू असल्याची माहिती जिल्हा हिवताप आरोग्य अधिकारी यांनी दिली.बऱ्याच ठिकाणी नागरी या कोरोनाच्या काळात स्वच्छता ठेवत असले तरी गरीब वस्तीमध्ये अजुनही घाणीचे साम्राज्य पाहायला मिळते. त्यामुळे डासांची उत्पत्ती अधिक झाल्यास कोरोनसह डेंग्यू आणि मलेरिया याचाही उद्रेक होऊ शकतो.
Last Updated : Sep 24, 2020, 1:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details