महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडारा : मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्र्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली - BJP

महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रस्त्याने नागरिकांचे अभिवादन स्वीकारत असताना अचानक विजांचे तार समोर आले. दोघेही सतर्कता दाखवून खाली वाकल्याने मोठी दुर्घटना टळली.

मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्र्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली

By

Published : Aug 3, 2019, 9:20 PM IST

भंडारा - महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. रस्त्याने जात असताना मुख्यमंत्री आणि बावनकुळे नागरिकांचे अभिवादन स्वीकारत असताना अचानक विजपुरवठा तार समोर आली. दोघेही सतर्कता दाखवून खाली वाकल्याने मोठी दुर्घटना टळली.

मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्र्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली

या घटनेमुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुख्यमंत्री ज्या रथावर उभे राहणार होते त्याची उंची कीती असेल? आणि मार्गावर असणाऱ्या विजेच्या तारांना त्याचा स्पर्श होतो का? याची सुरक्षा यंत्रणेकडून तपासणी झाली नसल्याचे समोर आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details