भंडारा - महाशिवरात्री निमित्ताने आज(शुक्रवार) संपूर्ण जिल्ह्यात महादेवाच्या मंदिरात भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. भंडारा शहरातील प्रसिद्ध 'बहिरंगेश्वर' मंदिरातही पहाटेपासूनच भक्तांची मांदियाळी सुरू आहे. रात्री बारा वाजेपर्यंत या मंदिरात जवळपास वीस हजारांवर भाविकांनी दर्शन घेतले आहे. तर, या मंदिराच्या परिसरात आजपासून मातीच्या भांड्यांचा मोठा बाजार भरतो. जिल्ह्यातील गायमुख, कोरम्बी, झरी, चुलबंद या प्रमुख स्थानासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी यात्रा भरते.
भंडारा शहरातील आणि जवळच्या गावातील नागरिक श्रद्धास्थान असलेल्या बहिरंगेश्वर मंदिरात येऊन मोठ्या भक्तिभावाने शिवलिंगाची पूजा अर्चना करतात. पहाटे पाच वाजल्यापासून या मंदिरात पूजा अर्चना सुरू होते. भक्तांसाठी सकाळी सहा ते रात्री 12 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी उघडे असते. हे मंदिर भंडाऱ्याच्या लोकांसाठी श्रद्धेचे स्थान असल्याने खासदार, आमदार, नगराध्यक्ष आणि सर्व नेते मंडळी, व्यापारी, सर्वसामान्य नागरिक रांगेत उभे राहून दर्शन घेतात.
मातीच्या भांड्यांचा बाजार -