भंडारा -जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता भंडारा जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी महाशिवरात्री यात्रा रद्द केली आहे. जिल्ह्यातील सर्व मंदिरे सर्वसामान्य भक्तांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहेत. भक्तांनी त्यांच्या घरीच महादेवाची पूजा करावी आणि कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मदत करावी अशी विनंती जिल्हाधिकारी आणि मंदिरांच्या पुजारी तर्फे करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील मंदिरे भाविकांसाठी बंद -
भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्ण खूप मोठ्या प्रमाणात नसले तरी दररोज किमान 40 नवीन रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे ही वाढणारी संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी होणारे कार्यक्रम नियंत्रित करून किंवा रद्द करण्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेश काढलेल्या आहे. गुरुवारी होऊ घातलेल्या महाशिवरात्री यात्रा ही रद्द करण्यात आल्याच्या आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील सर्व शिव मंदिर भाविकांसाठी गुरुवारी बंद राहणार आहेत. येणाऱ्या भाविकांना परत पाठविण्यासाठी आणि मंदिराच्या ठिकाणी गर्दी होणार नाही यासाठी पोलिस बंदोबस्त लावले जाणार आहे. केवळ नित्यनियमाप्रमाणे सकाळी महादेवाची पूजा ही स्थानिक पुजाऱ्यांच्यांद्वारे केली जाणार आहे.