महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'पांडे महल' खरेदी व्यवहाराची तातडीने चौकशी करा; नाना पटोलेंचे आदेश

साधारण ३०० वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या भंडारा शहरातील पांडे महलाचा १ तृतीयांश भागाची विक्री २०१७ मध्ये पांडे यांच्या काही वंशजांनी केली होती. भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांच्या नातेवाइकांना ही खरेदी केली होती. मात्र, या व्यवहारात अवैध कागदपत्रे सादर करण्यात आले असल्याचे आक्षेप घेण्यात आले आहेत.

By

Published : Jun 22, 2020, 4:07 PM IST

Pande Mahal Bhandara
पांडे महल भंडारा

भंडारा - ऐतिहासिक वास्तू असलेल्या आणि साधारण ३०० वर्षांपेक्षा जुन्या असलेल्या भंडारा शहरातील पांडे महलाचा १ तृतीयांश भागाची विक्री २०१७मध्ये पांडे यांच्या काही वंशजांनी केली होती. भंडारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष तथा भंडारा-गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांच्या नातेवाईकांना ही खरेदी केली होती. मात्र, या व्यवहारात अवैध कागदपत्रे सादर करण्यात आले असल्याचे आक्षेप घेण्यात आले आहेत. याच व्यवहाराची चौकशी करून 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी तहसीलदारांना दिले असून व्यवहारात त्रुटी असल्यास व्यवहार रद्द करण्यासही सांगितले आहेत.

काही मृत वंशजांच्या स्वाक्षऱ्या या रजिस्ट्रीमध्ये करण्यात आल्याचे सांगत पांडे महल बचाओ कृती समितीचे सदस्य तसेच पांडे यांचे वंशज अक्षय पांडे यांनी या विक्रीवर आक्षेप घेतला असून या विक्रीची सखोल चोकशी करून महालाची विक्री थांबवण्यात यावी, अशी मागणी पांडे यांनी केली आहे.

पांडे महल बचाओ कृती समितीचे सदस्य तसेच पांडे यांचे वंशज अक्षय पांडे यांची प्रतिक्रिया..

हेही वाचा...धक्कादायक! चारित्र्याच्या संशयावरून सुपारी देऊन पत्नीची हत्या...

भंडारा गोंदिया क्षेत्रातील सर्वात जुनी वास्तू तसेच ऐतिहासिक महल म्हणून पांडे महलची ओळख आहे. हा महल शहराच्या तसेच बाजारपेठेच्या मध्यभागी असून पांडे महल ही भंडारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष तथा गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांच्या नातेवाईकांच्या नावाने खरेदी आहे. असे असले तरिही अप्रत्यक्ष खासदार सुनील मेंढे यांनी नातेवाइकांना पुढे करून ही खरेदी केली असल्याचा आरोप पांडे महल बचाओ समितीने केला आहे.

हा संपूर्ण व्यवहार चुकीच्या कागदपत्राच्या आधारे केला गेला असून हा व्यवहार रद्द करावा आणि ही वास्तू पुरातत्व विभागाला देऊन त्याचे संवर्धन करावे, यासाठी पांडे महाल बचाव समितीच्या माध्यमातून बऱ्याच वेळा मंत्र्यांना सुद्धा त्याची तक्रार केली होती. मात्र, यापूर्वी या तक्रारीची कधीही दखल घेतली गेली नाही. मात्र, पहिल्यांदाच विधानसभा अध्यक्षांनी या तक्रारीची दखल घेत तातडीने बैठक बोलावून बचाव समिती आणि अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकले.

पांडे महलच्या खरेदी-विक्री व्यवहारात चुकीच्या पद्धतीचा वापर करण्यात आला. तसेच अवैध कागदपत्रे सादर करण्यात आली, असा आक्षेप समितीने यावेळी नोंदवला. यावर तहसीलदारांनी या व्यवहाराची पंधरा दिवसांत चौकशी करावी, अशी सूचना पटोले यांनी केली. या व्यवहारात चूक आढळल्यास तो व्यवहार रद्द करावा, असे पटोले यांनी सांगितले. पांडे महल खरेदी व्यवहारात चुकीच्या पत्रव्यवहाराचा वापर झाल्याचा आरोप समितीच्या वतीने करण्यात आला. यावर पटोले म्हणाले की, नगरपालिकेने या पत्रव्यवहाराची तातडीने चौकशी करावी.

हेही वाचा...शरद पवार- मुख्यमंत्री ठाकरे यांच्यातील बैठक संपली; विधान परिषदेच्या जागा वाटपावरून खलबते

पांडे महल सौंदर्यीकरणाचा आराखडा तातडीने तयार करण्याच्या सूचना पटोले यांनी पुरातत्व विभागाला दिल्या. पुरातत्व विभागाने नोटिफिकेशन काढून या कामाला गती द्यावी. यासाठी वास्तुविशारद नेमावा असे, त्यांनी सांगितले. पुरातत्व विभागाने भंडारा जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू व गडकिल्ल्यांचा आढावा घेऊन विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

ABOUT THE AUTHOR

...view details