महाराष्ट्र

maharashtra

भंडाऱ्यातील प्रेमीयुगुलाची वैनगंगेत आत्महत्या; प्रेमाला विरोध असल्याने उचलले पाऊल?

By

Published : Mar 13, 2021, 10:30 AM IST

Updated : Mar 13, 2021, 10:59 AM IST

सोनम यांच्या पतीचे वर्षभरापूर्वी निधन झाले होते. सोनमला 14 वर्षाचा मुलगा व 11 वर्षाची मुलगी आहे. पतीच्या मृत्यूनंतर सोनम एकटी पडली होती. त्यातच दोन मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी तिच्यावर आली होती. यादरम्यान नाशिकने सोनमला बरीच मदत केली. त्यामुळे हळूहळू या दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळून आले होते. त्यानंतर त्यांच्या प्रेमाला विरोध झाल्यानेच त्यांनी आत्महत्या केल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे,

bhandara
भंडाऱ्यातील प्रेमी युगालाची वैनगंगेत आत्महत्या

भंडारा- प्रेमसंबंधात रूढी परंपरांची बंधने अडचणीची ठरत असल्याने प्रेमीयुगुलाने वैनगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजन घटना भंडारा शहरात उघडकीस आली आहे.
नाशिक बावनकुळे (वय 29) आणि सोनम (वय 32) असे आत्महत्या करणाऱ्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे. हे दोघेही भंडारा शहरातील शुक्रवार वार्डातील रहिवासी होते.

भंडाऱ्यातील प्रेमी युगालाची वैनगंगेत आत्महत्या

आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलामधील मुलाचे वय त्याच्या प्रेयसीपेक्षा कमी होते. या शिवाय त्याची प्रेयसी ही विधवा असून तिला दोन अपत्ये होती. त्यामुळे दोन्ही कुटुंबीयांनी त्यांच्या प्रेमाचा स्वीकार केला नसावा, त्यामुळेच त्यांनी आत्महत्येसारखे कठोर पाऊल उचलले असल्याची चर्चा नागरिकांमधून सुरू आहे.

वर्षभरापूर्वीच पहिल्या पतीचा मृत्यू-

सोनम यांच्या पतीचे वर्षभरापूर्वी निधन झाले होते. सोनमला 14 वर्षाचा मुलगा व 11 वर्षाची मुलगी आहे. पतीच्या मृत्यूनंतर सोनम एकटी पडली होती. त्यातच दोन मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी तिच्यावर आली होती. यादरम्यान नाशिकने सोनमला बरीच मदत केली. त्यामुळे हळूहळू या दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळून आले. सोनम आणि नाशिक हे शेजारी राहत असल्याने त्याचातील प्रेम अधिकच बहरले. दोघांनी पुढील आयुष्य एकमेकांसोबत घालविण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या .

भंडाऱ्यातील प्रेमी युगालाची वैनगंगेत आत्महत्या
रूढी-परंपरा ठरल्या अडचणीच्या-त्या दोघांनीही नवीन आयुष्याचे स्वप्न जरी रंगवली असले तरी सोनम नाशिकपेक्षा वयाने मोठी आणि ती विधवाही होती. तसेच तिला दोन अपत्य असल्याने कदाचित कुटुंबीयांनी दोघांच्या विवाहाला विरोध केला असावा. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
वैनगंगा नदीत घेतली उडी-
सोनम घरून गायब असल्याची तक्रार तिच्या दिराने भंडारा पोलिसात दाखल केली होती. यावरून पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. दरम्यान, वैनगंगा नदी तीरावरील निर्वाण घाटाजवळ सोनमची दुचाकी आढळून आली. यावरून पोलिसांनी शोध सुरू केला असता, सकाळी 11 वाजताच्या सुमारास नदीत तिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. तिथे जवळच पुरुषाच्या चप्पल व मोबाईल पोलिसांना सापडल्याने नाशिक याच्या भावाला घटनास्थळावर बोलावून चप्पल व मोबाईल दाखवण्यात आली. त्यावेळी त्या वस्तू नाशिकच्या असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी श्वान पथकाला घटनास्थळावर पाचरण केले असता, त्यानेही नदीकडे माग दाखवला. त्यानंतर पोलिसांनी बोटीच्या माध्यमातून नाशिकचा शोध घेतला असता, दुपारी तीन वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडला. दोघांच्याही मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी भंडारा पोलिसांनी मर्ग दाखल केला असून घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Last Updated : Mar 13, 2021, 10:59 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details