- सिल्लोड नगरपालिका पोट निवडणुकीसाठी एकूण मतदान 58.91 टक्के
Local Body Election Live Update : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदान; वाचा कुठे काय परिस्थिती? - Live Updates Bhandara Elections
19:32 December 21
19:32 December 21
- परभणी - जिल्ह्यातील पालम पंचायत समितीसाठी 3.30 वाजेपर्यंत 71.62 टक्के मतदान.
19:30 December 21
जालना जिल्ह्यात 03.30 वाजेपर्यंत एकूण 61.06 टक्के मतदान
- घनसावंगी नगर पंचायत: 76.78 टक्के मतदान
- बदनापूर नगर पंचायत:67.29टक्के मतदान
- तिर्थपुरी नगर पंचायत:72.52 टक्के मतदान
- मंठा नगर पंचायत:67.84 टक्के मतदान
- जाफ्राबाद नगर पंचायत:66.15 टक्के मतदान
19:30 December 21
- पाटण नगरपंचायतीसाठी दुपारपर्यंत ६३.३० टक्के मतदान
19:19 December 21
- अमरावती भातकुली नगरपंचायत मतदान : अंतरिम आकडेवारीनुसार ८१.६१ टक्के
19:15 December 21
- पाटण नगरपंचायतीसाठी दुपारपर्यंत ६३.३० टक्के मतदान
19:14 December 21
देहू नगरपंचायत निवडणूक २०२१ मतदान आकडेवारी
- देहू नगरपंचायत निवडणुकीत 5.30 पर्यंत 74.97% मतदान
16:49 December 21
नंदुरबार नगरपंचायत निवडणूक मतदान टक्केवारी
धडगाव नगरपंचायत निवडणूक : दुपारी 3.30 वाजेपर्यंत मतदान 74.58 टक्के
16:46 December 21
अमरावती : नगर पंचायत मतदान टक्केवारी
- तिवसा नगर पंचायत मतदान दुपारी 3.30 पर्यत 52.13 टक्के मतदान
- भातकुली नगर पंचायत मतदान दुपारी 3.30 पर्यंत 67.48 टक्के मतदान
16:44 December 21
वाशिम : मानोरा नगर पंचायत निवडणूक मतदान अपडेट
- दुपारी 3.30 पर्यंत 56.93 टक्के मतदान
16:42 December 21
ठाणे नगरपंचायत निवडणूक मतदान टक्केवारी
- मुरबाड आणि शहापूरमध्ये दुपारी १.३० वाजेपर्यंत अनुक्रमे 47.2 आणि 53.8 टक्के मतदान
15:33 December 21
गडचिरोली 9 नगरपंचायत निवडणूक मतदान टक्केवारी
- दुपारी 1.30 वाजेपर्यंत एकूण 63.96 % मतदान
15:32 December 21
परभणी : पालम पंचायत समिती निवडणूक
- 1.30 वाजेपर्यंत 55.3 टक्के मतदान
15:25 December 21
चंद्रपूर जिल्ह्यात सहा नगरपंचायतसाठी 1.30 वाजेपर्यंतचे मतदान
- सावली : 44.56 टक्के
- पोंभुरणा:39.93 टक्के
- गोंडपिपरी: 40.09 टक्के
- कोरपना : 59.85 टक्के
- जिवती : 47.80 टक्के
- सिंदेवाही : 32.81 टक्के
- नागभीड : 25.94 टक्के
- एकूण : 39.86 टक्के
15:24 December 21
सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आतापर्यंची आकडेवारी
- माळशिरस नगरपंचायत साठी आज 3 दुपार पर्यंत 40% मतदान झाले आहे
15:22 December 21
सांगली नगरपंचायत निवडणूक 1:30 पर्यंतची मतदान टक्केवारी
- कवठेमहांकाळ नगरपंचायत 52.75 टक्के
- खानापूर नगरपंचायत 58.75 टक्के
- कडेगाव नगरपंचायत 48.79 टक्के
- तीन नगरपंचायत सरासरी टक्के मतदान 53 टक्के
14:44 December 21
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक : आतापर्यंतची आकडेवारी
- गोंदिया : जिल्हा नगरपंचायत निवडणूक 1.30 वाजेपर्यंत 58.69 टक्के मतदान
- जालन्यात 1.30 वाजेपर्यंत 52.94% मतदान
14:22 December 21
अहमदनगर येथे 17 पैकी 13 जागांसाठी मतदान
अहमदनगर -जिल्ह्यातील अकोले नगरपंचायत निवडणूकीत काॅग्रेसचे बाळासाहेब थोरात, भाजपाचे मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड आणी राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांची प्रतीष्ठा पणाला लागली आहे. 17 पैकी 13 जागेसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना राष्ट्रवादी आणि शिवसेनेची एकत्र आघाडी होवू शकली नाही. शिवसेना आणी राष्ट्रवादीची सात जागेवर आघाडी झाली असून काॅग्रेस आणी भाजप स्वबळावर लढताहेत. अनेक उमेदवारांनी शेवटच्या दिवशी अर्ज मागे न घेतल्याने गोंधळाची स्थिती असून सहा जागेवर शिवसेना राष्ट्रवादीही आमनेसामने लढताहेत.सात जागेवर शिवसेना राष्ट्रवादीची आघाडी आहे. काॅग्रेस केवळ सात जागा लढवत असून भाजपाचे 12 जागेवर उमेदवार उभे आहेत.19 ठिकाणी मतदान केंद्रावर 13 हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
13:18 December 21
सातारा जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींसाठी मतदानाला सुरुवात
सातारा : सातारा जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींसाठी आज सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या पहिल्या टप्प्यात सर्वच मतदान केंद्रांवर गारठ्यामुळे गर्दी कमी असली तर मतदारांमध्ये उत्साह कायम होता. जिल्ह्यातील कोरेगाव, वडूज, दहिवडी, खंडाळा, लोणंद व पाटण या नगरपंचायतींसाठी आज मतदानाचा दिवस आहे. या 6 नगरपंचायतींसाठी 266 उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात 113 मतदान केंद्रांवर प्रक्रिया मतदान प्रक्रीया शांततेत पार पडत आहे. ग्रामपंचायतीमधील ७८५ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक लागली आहे. यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, ५१० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज निवडणूक दाखल केले आहेत. या रिक्त जागांसाठीही आज, मंगळवारी मतदान प्रक्रिया शांततेत सुरु झाली आहे.
11:43 December 21
गडचिरोली जिल्हा 9 नगरपंचायत निवडणूक मतदान टक्केवारी
सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत .
एकुण 18.33 % मतदान
11:42 December 21
चंद्रपूर जिल्ह्यात सहा नगरपंचायत साठी 9.30 वाजेपर्यंतचे मतदान
सावली : 7.31 टक्के
पोंभुरणा : 9.50 टक्के
गोंडपिपरी : 8.90 टक्के
कोरपना : 15.65 टक्के
जिवती : 9.67 टक्के
सिंदेवाही : 6.76 टक्के
11:34 December 21
नाना पटोले यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क
Bhandara : नाना पटोले यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क
त्यांच्या जिल्ह्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली बंडखोरी
पाच बंडखोरांना सहा वर्षासाठी केले निलंबित
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज सकाळी 7. 30 ते 9.30 वाजेपर्यंत भंडारा जिल्ह्यात 27.43 टक्के मतदान झाले
11:15 December 21
गडचिरोली जिल्ह्यात 9 नगर पंचायतीसाठी मतदान
गडचिरोली : जिल्ह्यातील नऊ नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मंगळवारी सकाळी साडेसात वाजता पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. 9 नगरपंचायतीच्या 142 जागांसाठी तब्बल 555 उमेदवार रिंगणात आहेत. तर आजच जिल्ह्यातील 63 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठीही मतदान पार पडत आहे. दुर्गम भागातील मतदान केंद्रावर हेलिकॉप्टरद्वारे कालच पोलिंग पार्टी रवाना झाल्या होत्या. 28 नक्षलवादी ठार मारल्यानंतर ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक असून दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. एकूणच या निवडणुकीसाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.
11:13 December 21
अमरावती जिल्ह्यातील तिवसा व भातकुली नगरपंचायत निवडणूक
तिवसा नगरपंचायतसाठी सकाळी९.३० वाजता पर्यंत ५.०४टक्के मतदान
भातकुली नगरपंचायतसाठी १३.१०टक्के मतदान
दोन्ही नगरपंचायतसाठी मतदानाला मतदार राजाचा अल्प प्रतिसाद
11:12 December 21
बोदवड नगरपंचायतीचे सकाळी 10:00 वाजेपर्यंत 8% मतदान...
आता पर्यंत पासून 704 पुरुषांनी तर 527 महिलांनी बजावला मतदानाचा हक्क आतापर्यंत 1231 मतदान झालेला आहे.
तीर्थपुरीत तेरा मतदान केंद्रावर 9.30 पर्यत 1082 मतदान (18.76 टक्के) झाले
जाफराबाद सरासरी 20% मतदान
11:12 December 21
जळगाव बोदवड अपडेट
बोदवड नगरपंचायतीचे सकाळी 10:00 वाजेपर्यंत 8% मतदान...
आता पर्यंत पासून 704 पुरुषांनी तर 527 महिलांनी बजावला मतदानाचा हक्क आतापर्यंत 1231 मतदान झालेला आहे.
11:08 December 21
गोंदियात कडाक्याच्या थंडीत मतदारांता उत्साह
11:07 December 21
गडचिरोली जिल्ह्यातील 9 नगरपंचायतीसाठी मतदानाला सुरुवात
गडचिरोली : जिल्ह्यातील 9 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी 7.30 वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली.142 जागांसाठी तब्बल 555 उमेदवार रिंगणात असून आजच 63 ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. 28 नक्षलवादी ठार मारल्यानंतर ही पाहिलीच सार्वत्रिक निवडणूक होत असून दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. निवडणुकीसाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
11:06 December 21
नागपूरमध्ये भाजप सत्ता मिळवणार की काँगेस राष्ट्रवादी बाजी मारणार
नागपूर -हिंगणा आणि कुही या दोन नगरपंचायत निवडणूक होत आहे. तर ओबीसीमुळे रद्द झालेल्या 4 जागेसाठी नंतर मतदान होणार आहे. यात 13 जागेसाठी आज मतदान प्रक्रिया राबवली जात आहे. हिंगणा नगरपंचायत मतदार संघात 47 उमेदवार तर कुही नगरपंचायत मध्ये 52 उमेदवार रिंगणात आहे. या दोन्ही ठिकाणी ओबीसी आरक्षणामुळे दोन्ही नगरपंचायतच्या चार जागांसाठी येत्या 18 जानेवारीला मतदान होणार असून 19 जानेवारीला मतमोजणी नंतर निकाल लागणार आहे.
10:17 December 21
सांगली मतदान टक्केवारी
सांगली फ्लॅश - नगरपंचायत मतदान टक्केवारी 9.30 पर्यंत
कवठेमहांकाळ नगरपंचायत - 14.2 / टक्के..
खानापूर नगरपंचायत - 17.58./ टक्के
कडेगाव नगरपंचायत - 12.37 /टक्के.
09:53 December 21
अमरावतीत तिवसा भातकुली नगरपंचायतीच्या ३० सदस्य पदासाठी मतदान प्रक्रियेला सुरवात
अमरावती - जिल्ह्यातील तिवसा व भातकुली नगरपंचायतीच्या ३०सदस्यपदाकरिता आज मतदान होत आहे. यामध्ये १६,१८९ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यात तिवसा नगरपंचायतच्या १४जागेसाठी ६२ उमेदवार रिंगणात असून भातकुलीच्या १६जागेसाठी६०उमेदवार रिंगणात आहे. तिवसा नगरपंचायतवर महिला व बालकल्याण मंत्री व अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या काँग्रेस पक्षाची होती. तर भातकुली नगरपंचायतवर आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या युवा स्वाभिमान संघटनेची सत्ता होती त्यामुळे या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहेत.
09:52 December 21
गुलाबी थंडीत मानोरा नगर पंचायतीचे मतदानाला सुरुवात
वाशिम : जिल्ह्यातील मानोरा नगर पंचायत च्या मतदानाला सकाळ पासून गुलाबी थंडीत सुरुवात झाली आहे. मानोरा नगर पंचायत मध्ये एकूण 17 प्रभागासाठी मतदान होणार होते.मात्र न्यायालयाने ओबीसी ला स्थगिती दिल्यामुळे 4 प्रभागाची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने प्रत्यक्षात 13 प्रभागासाठी 59 उमेदवार रिंगणात असून,सहा हजार 13 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,यांनी आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत.
08:59 December 21
जालना जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीसाठी आज मतदान
जालना -घनसावंगी तीर्थपुरी बदनापुर जाफराबाद आणि मंठा या पाच नगरपंचायतीचे मतदान आज पार पडणार आहे. राज्याच्या दोन दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आज पणाला लागली आहे. घनसावंगी आणि तीर्थपुरी येथे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा मतदारसंघ असल्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. बदनापूर आणि जाफराबाद या दोन नगरपंचायतीसाठी देशाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. जिल्ह्यात एकूण 107 मतदान केंद्रापासून असून दोनशे वीस उमेदवार रिंगणात आहेत. 220 उमेदवारांचे भवितव्य आज मतदान मशीन मध्ये कैद होणार आहे.
08:43 December 21
जाफराबाद (जालना) - तेरा प्रभागातून ४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
जाफराबाद - जाफराबाद नगर पंचायत निवडणुकीसाठी सकाळी सात वाजता सुरूवात झाली. जाफराबाद नगर पंचायत निवडणूकीसाठी तेरा प्रभागातून ४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. १० हजार ७३७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.
08:40 December 21
ग़डचिरोली -गडचिरोली जिल्ह्यातील 9 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले असून सकाळी 7.30 वाजता पासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदानाची मुदत आहे. 27 नक्षलवादी मारल्यानंतर पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे.
08:39 December 21
सांगली :- सांगली जिल्ह्यातील 3 नगरपंचाती साठी मतदानाला सूरुवात, मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, मतदारांच्या रांगा
08:19 December 21
भंडारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदानाला सुरुवात
भंडारा : भंडारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदानाला सुरुवात झाली आहे सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली असली तरी वाढलेल्या थंडीचा प्रभाव या मतदानावर पाहायला मिळतो आहे