महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लाचखोर लाखांदूर तहसीलदाराला लाचलुचपत विभागाने केली अटक

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील तहसिलदार यांना 10 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे.

By

Published : Feb 12, 2021, 5:27 PM IST

भंडारा - भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील तहसिलदार यांना 10 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. ट्रँक्टरने रेतीची चोरटी व अवैध वाहतूक करण्यासाठी मोबाईल फोनवरुन 10 हजार रुपयाची लाच या लाखांदूर तहसिलदारांनी मागितली होती. विशेष म्हणजे या तहसीलदारांना लाचलुचपत विभागाने दुसऱ्यांदा अटक केली असल्याची माहिती समोर येत आहे. निवृत्ती जगन उइके (55) असे अटकेतील लाचखोर तहसिलदाराचे नाव आहे.

घटनेतील तक्रारदाराला यापूर्वी 2 फेब्रुवारी रोजी आरोपी तहसिलदाराने तालुक्यातील धर्मापुरी येथील रेतीघाटावरुन रेतीची चोरटी वाहतूक करतांना रंगेहात पकडून पोलिसात गुन्हा दाखल केला होता. यावेळी तहसिलदारांनी तक्रारदाराला फोन करून यापुढे रेतीची चोरटी वाहतूक करण्याची असल्यास दरमहा 10 हजार रु. हफ्त्याची मागणी केली होती. सदर घटनेने व्यथित तक्रारदाराने याप्रकरणी भंडारा एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरुन भंडारा एसीबीने जाळे टाकुन 10 फेब्रुवारी रोजी मोबाईल फोनवरुन 10 हजारांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने आरोपी तहसिलदारांविरोधात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

जिल्ह्यात सध्या अवैध वाळू चोरीचा सपाटा सुरू-

भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होतो. मात्र दोन वर्षापासून वाळूच्या घाटांचा लिलाव झाला नसल्याने अवैध वाळू चोरीचे प्रमाण अतिशय वाढले आहे. यासह महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचारही वाढला आहे. वाळू माफियांना वाळूची वाहतूक करण्यासाठी पैशांची मागणी केली जात आहे. मात्र अश्या कार्यवाही क्वचित पाहायला मिळतात. इतरवेळी देवाणघेवाण होऊन अवैध वाळू चोरी केली जात आहे.

या अगोदरही कार्यवाही झाल्याचे समोर-

दरम्यान, गत 5 वर्षापुर्वी देखील घटनेतील आरोपी तहसिलदार अशाचप्रकारे लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात अडकल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही कारवाई सबंधित अधिकाऱ्याच्या सेवेतील 1 दुसरी कारवाई असल्याचे बोलल्या जात आहे. दरम्यान ही कारवाई 10 फेब्रुवारीला एसीबी अंतर्गत पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक पुरुषोत्तम अहेरकर, योगेश्वर पारधी, पोलीस नाईक कोमल बनकर, सुनिल हुकरे, दिनेश धार्मिक, राजेंद्र कुरुडकर यासह अन्य पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details