भंडारा -तेली समाजातर्फे आयोजित सत्कार सोहळ्यावेळी नागरिकांना संबोधित करताना रोजगार हमी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी 'जाती सोडा, भारत जोडा' हे घोषवाक्य दिले आहे. येणाऱ्या काळात समाजाच्या उत्थानासाठी कार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. भंडारा जिल्हा तेली समाजतर्फे संताजी मंगल कार्यालयात नव्याने मंत्री झालेल्या मंत्री, खासदार यांचा सत्कार ठेवला होता. त्यावेळी ते बोलत होते.
या सत्कार सोहळ्यात रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्यासोबतच राज्यमंत्री परिणय फुके आणि नुकतेच खासदार झालेले सुनील मेंढे तसेच, आमदार चरण वाघमारे, आमदार रामचंद्र अवसरे यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.