भंडारा- मागच्या फडणवीस सरकारने निवडणुकीपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचे फोन टॅप केले होते. त्यासाठी एका अधिकाऱ्याला ट्रेनिंग देण्यासाठी इस्राईलला पाठवण्यात आले असल्याचे सांगत, याप्रकरणी चौकशी करणार असल्याची प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
फोन टॅप करण्यासाठी इस्राईलवरून एक सॉफ्टवेयर मागील भाजप सरकारने आणले असल्याचेही यावेळी गृहमंत्र्यांनी सांगितले. आपण याची चौकशी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.