भंडारा - शिकारीसाठी लावलेल्या विजेच्या सापळ्यात अडकून मृत्यू झालेल्या रुद्र (बी 2 ) वाघाच्या ( Rudra tiger death case in Bhandara ) मारेकऱ्याला चोवीस तासाच्या आत अटक करण्यात भंडारा वनविभाग आणि पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी चांदोरी येथील दिलीप नारनवरे याला ( Tiger hunter Dilip Narnavare arrest in Bhandara ) अटक करण्यात आली आहे. आणखी तीन आरोपी असल्याची माहिती भंडार्याचे उपवनसंरक्षक एस. बी. भेलावी यांनी ( Forest ranger S B Bhelavi on tiger death ) पत्रकार परिषदेत दिली.
वाघाच्या मृत्यु प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईची माहिती उपवनसंरक्षक उपवनसंरक्षक एस. बी. भेलावी यांनी दिली आहे.
हेही वाचा-BJP MLA Suspension Quashes : 'लक्षात घ्या, भाजप आमदारांना न्यायालयानं सुनावलं आहे' : नवाब मलिक
28 तारखेला मृत अवस्थेत मिळाला होता रुद्र
भंडारा तालुक्यातील पलाडी गावालगत शेतात 28 जानेवारी रोजी ( tiger death in Paladi ) वाघ मृतावस्थेत आढळून आला होता. रूद्र (बी 2) नावाने या वाघाला ओळखले जात होते. हा वाघ रावनवाडी, धारगाव जंगलात भ्रमंती करीत होता. घटनेच्या दिवशी पहिल्यांदाच पलाडी क्षेत्रात आला होता. या संपूर्ण परिसरात शेती केली जाते. रुद्र मृत अवस्थेत आढळला, तिथे वरून जाणार विद्युत तार होती. तसेच बाजूने वाहणारा नाला होता. त्यामुळे शिकाऱ्यांनी येथे विद्युत तारा लावून ठेवल्या होत्या.
हेही वाचा-Mumbai Corona Update : मुंबईत १,४११ नव्या रुग्णांची नोंद, ११ जणांचा मृत्यू
लहान प्राण्यांसाठी लावले होते तार
शिकार्यांनी रानडुक्कर आणि इतर छोट्या प्राण्यांच्या शिकारीसाठी या विद्युत तारा लावल्या होत्या. मात्र या विद्युत तारांना स्पर्श होऊन रुद्रचा मृत्यू झाला असा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्या अनुषंगाने आरोपीचा शोध घेण्यासाठी शुक्रवारी सुरुवात करण्यात आली होती.