महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भंडारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने शंभरी ओलांडली - bhandara corona update

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या आठ रुग्णांमध्ये तुमसर तालुक्यातील तरुणांचा समावेश आहे. हे सर्व कुवेतवरून भंडारा जिल्ह्यात परत आले होते. त्या सर्वांना भंडारा येथील इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते.

bhandara covid 19
भंडारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने शंभरी ओलांडली

By

Published : Jul 9, 2020, 1:02 PM IST

भंडारा - मागील 24 तासात 8 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आले असून, यात भंडारा तालुक्यातील तीन, तुमसर चार, व लाखांदूर तालुक्यातील एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत 79 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या 106 झाली असून, 27 सक्रिय रुग्ण आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या आठ रुग्णांमध्ये तुमसर तालुक्यातील तरुणांचा समावेश आहे. हे सर्व कुवेतवरून भंडारा जिल्ह्यात परत आले होते. त्या सर्वांना भंडारा येथील इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. तसेच लाखांदूर तालुक्यातील 28 वर्षीय तरुण हा कुवेतवरून आला होता. भंडारा तालुक्यातील मध्यप्रदेशमधून 35 वर्षीय व्यक्ती, अमरावतीवरून 32 वर्षीय व्यक्ती, कर्नाटक राज्यातून 29 वर्षीय तरूण भंडारा तालुक्यात आले होते. या सर्वांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 106 झाली आहे.

आतापर्यंत 79 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली असून, 27 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. आतापर्यंत 4 हजार 824 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत 106 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर 4 हजार 494 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 224 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.

बुधवारी आयसोलेशन वार्डमध्ये 26 व्यक्ती भरती असून, आतापर्यंत 501 व्यक्तींना आयसोलेशन वार्डमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोविड केअर सेंटर साकोली, तुमसर, लाखांदूर, पवनी, लाखनी, भंडारा व मोहाडी येथे 394 भरती आहेत. 3 हजार 837 व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईनमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुणे, मुंबई व इतर राज्यातून 44 हजार 710 व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आले असून, 41 हजार 601 व्यक्तींचा 28 दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या 3 हजार 109 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांनी घरामध्येच रहावे, घराबाहेर पडू नये अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details